Lucknow Accident: अपघातानंतर कारने दुचाकीला 100 मीटरपर्यंत फरफटत नेले, एकाच कुटुंबातील चौघे ठार

Lucknow Car And Bike Accident: हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
Lucknow Car And Bike Accident
Lucknow Car And Bike AccidentANI
Published On

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊमध्ये कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये (Lucknow Car And Bike Accident) एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना लखनऊच्या विकास नगरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा घडली. अपघातानंतर भरधाव कारने दुचाकीला 100 मीटरपर्यंत फटफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा तपास लखनऊ पोलिसांकडून (Lucknow Police) सुरु आहे.

Lucknow Car And Bike Accident
Uttar Pradesh News: हृदयद्रावक! लग्नाच्या काही तास आधीच नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या विकास नगर येथील गुलचीन मंदिराजवळ हा अपघात झाला. भरधाव स्कॉर्पिओ कारने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन पती-पत्नी आणि दोन लहान मुलं प्रवास करत होते. धडक दिल्यानंतर कारने दुचाकीला 100 मीटरपर्यंत फटफटत नेले. त्यानंतर या कारने झाडाला धडक दिली.

या अपघाताची माहिती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या चौघांनाही केजीएमयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन चौघांनाही मृत घोषीत केले. या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी मृतांची ओळख पटवली. सीतापूरचे रहिवासी राम सिंह, त्याची पत्नी आणि दोन मुले यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला.

Lucknow Car And Bike Accident
Pune Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना; चारित्र्यावर संशय घेत पतीने चाकूने चिरला पत्नीचा गळा

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, गुलचीन मंदिरासमोर 100 मीटर अंतरावर वाकड्या पुलावरून येणाऱ्या स्कॉर्पिओने स्कूटीला धडक दिली. त्यानंतर स्कूटीसह सर्वजण स्कॉर्पिओखाली अडकले. चालकाने कार थांबविण्याऐवजी वेगाने पळवली. सुमारे 100 मीटरपर्यंत दुचाकीला फरफटत नेल्यानंतर स्कॉर्पिओ झाडाला धडकली आणि थांबली. यादरम्यान कारने दुचाकीला फरफटत नेल्यामुळे रस्त्यावर ठिणग्या बाहेर पडत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com