Pimpri Chinchwad Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News: महिलांशी गैरवर्तन करून सोनसाखळी चोरणाऱ्या २ चोरट्यांना अटक; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातूनही अशीच एक घटना समोर आली असून महिलांशी गैरवर्तन करून त्यांच्या सोनसाखळी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा चार पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. (Crime News In Marathi )

याबाबत अधिक माहिती अशी की, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्या घेतले आहे. बुद्धदेव विष्णू बिश्वास आणि मिटू मिहीर बिश्वास मुळ राहणार पश्चिम बंगाल अशा अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीचे नाव आहेत. या दोन्ही आरोपीकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसाचा गुन्हे शाखा चार पोलीस पदकाने जबरी चोरीचे एकुण सात गुन्हे उघडकीस आणले आहेत.

बुद्धदेव विष्णू बिश्वास आणि मिटू मिहीर बिश्वास हे दोन्ही अट्टल चोरटे पिंपरी चिंचवड शहरात राहून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिलाशी गैर वर्तन करून त्यांचे सोन्याचे दागिने बळजबरी चोरी करत असल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

मात्र हे दोन्ही आरोपी पिंपरी चिंचवड शहरात सारखं आपलं राहण्याच ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडण्याचा मोठा आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर होते. अखेर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा चार पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून, तसेच हिंजवडी परिसरात सापळा लावून या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT