culprit Arrested Saam Tv
मुंबई/पुणे

३५ लाखांच्या अंमली पदार्थांसह बंटी बबलीला अटक

दोघांजवळून २९५ ग्रॅम अंमली पदार्था जप्त केले असून त्याची किंमत ३५ लाख एवढी आहे.

सुरज सावंत

मुंबईच्या दहिसर पोलीसांनी (Police) ड्रग्जची तस्करी करणार्या बंटी आणि बबलीच्या जोडीला मोठया शिताफीने अटक (Arrest) केली आहे. हे दोघंही मुंबईत वर्षानुवर्षे अंमली पदार्थांचा व्यवसाय करत असल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांजवळून २९५ ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून त्याची किंमत ३५ लाख एवढी आहे.

हे देखील पाहा-

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे पती पत्नी दहिसर येथील आंबावाडी परिसरात राहतात, दोघेही ड्रग्जची खरेदी व विक्री करण्याचे काम करतात. झोन १२ चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांना दहिसर परिसरात काही लोक ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीसी पथकाने दहिसरच्या अंबावाडी जंक्शन पुष्प विहार कॉलनी, दहिसर पूर्व येथे छापा टाकला, त्यात जमीर बाबू मुजावर (३७) आणि फरजाना जमीर मुजावर (३१) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या घरातून ३५ लाख ४० हजार किमतीची हिरोईन जप्त करण्यात आली.

या प्रकरणी दहिसर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करून दोघांनाही अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना ११ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांवर यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: भाजप कामाठीपुऱ्याबाहेर उभा, त्यांना कुणीही चालते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

EPFO Pension Hike: EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किमान पेन्शन ५ पटीने वाढणार; १००० वरुन थेट ५००० होणार

Maharashtra Live News Update: १० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी, माजी आमदार नितीन भोसले यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश

Moogache Birde Recipe : थंडीत बनवा गरमा गरम झणझणीत हिरव्या मुगाचे बिरडे, वाचा सोपी रेसिपी

Agniveer Permanent Soldier: परमनंट व्हायचंय? अग्निवीरांनो लग्न विसरा! अग्निवीरांसाठी आता नवा मापदंड

SCROLL FOR NEXT