Abdul Sattar Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Abdul Sattar News: सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं; अब्दुल सत्तारांविरोधात मुंबईत २ तक्रारी दाखल

Abdul Sattar Controversial Statement: मुंबईत सत्तारांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांनी ठाण मांडल्यानंतर सत्तार हे बॅकफूटवर गेले असले तरी राष्ट्रवादी आक्रमकच आहे.

सूरज सावंत

Abdul Sattar Todays News: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत अतिशय आक्षेपार्ह विधान केलेले आहे. यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सत्तारांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. मुंबईत सत्तारांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांनी ठाण मांडल्यानंतर सत्तार हे बॅकफूटवर गेले असले तरी राष्ट्रवादी आक्रमकच आहे. मुंबईत मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. (abdul sattar controversial statement News)

पहिली तक्रार बोरिवली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अॅड. इंद्रपाल सिंग तक्रार सत्तारांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

दुसरी तक्रार रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ही तक्रार पोलिसांत दिली आहे. एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांना महेश तपासे यांनी तक्रार अर्ज दिला आहे. कृषिमंत्री यांना सत्तेचा माज आला आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. (Abdul Sattar Latest News)

अब्दुल सत्तार नरमले

दरम्यान राज्यभरातून होणारा विरोध पाहता कृषीमंत्री अब्दुल सत्तार नरमले आहेत. औरंगाबादमध्ये बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी कोणत्याही महिला भगिणींबाबत अपशब्द वापरला नाही. जे लोक आम्हाला बदनाम करतायत त्यांच्याबद्दल मी बोललोय. सुप्रिया सुळेंबाबत कोणताही शब्द बोललो नाही, पण तरिही त्यांच्या महिलालांची मनं दुखवली असेल तर मी खेद व्यक्त करतो, पण मी असं बोललो नाही.

मी जे बोललो ते फक्त खोक्यांबाबत बोललो ज्याच्या डोक्यात परिणाम आहे. पण जे वेगळा अर्थ काढू लागले. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महिलांचा सन्मान करतायत, तसा मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे असं सत्तार म्हणाले.

याबाबत पत्रकारांनी आणखी प्रश्न विचारले असता सत्तार म्हणाले की, तुम्ही मला उचकवण्याचं काम करु नका, तुम्ही आमच्यात भांडणं लावू नका. आगीत तेल टाकण्याचं काम करु नका. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी महिलांचा आदर कारणारा कार्यकर्ता आहे.

मी अल्टिमेटमला घाबरत नाही

राष्ट्रवादीने दिलेल्या २४ तासांच्या अल्टिमेटमबाबत सत्तार म्हणाले की, कुणीही अल्टिमेटम वैगेरे देऊ नका मी अल्टिमेटमला घाबरत नाही. मी महिलांबत काहीह बोललो नाही. कुणीही माझ्या घराच्या काचा वैगेरे फोडू नका, मी कुणालाही घाबरत नाही असं सत्तार म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT