Abdul Sattar Statement on Supriya Sule : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्याने राज्यात राष्ट्रवादीसह (ncp) विविध महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. सत्तार यांचा ठिक ठिकाणी निषेध नाेंदविला जात आहे. दरम्यान राज्याचे उदयाेग मंत्री उदय सामंत यांनी मंत्री महाेदय यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन हाेऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Abdul sattar latest news)
उद्याेग मंत्री उदय सामंत (uday samant) म्हणाले मी पंधरा दिवसांपुर्वी ट्विट केले हाेते. महाराष्ट्रात राजकारणाला फार माेठा वारसा आहे. यशवंतराव चव्हाणांपासून हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पर्यंत आहे. त्यांनी देखील एकमेकांवर टीका केली. परंतु वैयक्तिक टीकेचा स्तर जाे काही खालवला आहे. त्यात सुधारणा झाली पाहिजे.
माझा राजकीय प्रवास सन 1999 मध्ये सुरु झाला. आजपर्यंत माझ्यावर कधीही टीका झाली तरी मी पातळी साेडून बाेललाे नाही. दरम्यान सत्तार यांनी चुकीचे विधान (Abdul Sattar Statement on Supriya Sule) केले असेल तर त्यांचे समर्थन करणार नाही असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.