1900 pune mahanagar parivahan mahamandal workers will be permanent soon saam tv
मुंबई/पुणे

PMPML १९०० बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करुन घेणार; शिवसेनेच्या आंदाेलनाचे फलित

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News :

पीएमपीएमएल (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व परिविक्षाधीन सेवकांना मूळ वेतनश्रेणीसह तत्काळ कायम करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाने (shivsena eknath shinde faction) स्वारगेट येथील पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत महामंडळाने अखेर पात्र कर्मचाऱ्यांना १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत १९०० कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येईल असे लेखी पत्र शिवसेनेला दिले. (Maharashtra News)

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांनी परिवहन महामंडळकडील सर्व बदली कर्मचारी यांना शेड्युल मान्य कायम जागेवर नियुक्त करण्याच्या अनुषंगाने महामंडळातील प्रचलित कार्यप्रणाली धोरण कार्यवाहीला अनुसरून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या पीएमपी बदली कर्मचाऱ्यांचे हजेरी रेकॉर्ड मागून त्याबाबत पंधरा जानेवारीलाच परिपत्रक निर्गमित करण्यात आले.

तसेच या हजेरी डिफॉल्ट किंवा रेकॉर्ड बाबतची छाननी व तपासणी करून १५ फेब्रुवारी पर्यंत बदली कर्मचाऱ्यांची माहिती मागून पात्र कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. यामुळे आगामी काळात पात्र कर्मचारी कायम स्वरुपी नाेकरीस लागतील अशी आशा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

Bigg Boss Marathi Grand Finale: ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना-वैभवच्या धमाकेदार डान्सचा जलवा

Sabudana Role Recipe: उपवासाठी तयार करा झटपट साबूदाणा रोल्स, वाचा परफेक्ट रेसिपी

Marathi News Live Updates : उड्डाण पुलाच्या कामाच्या श्रेयवादाची लढाई; भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

Nandurbar News : भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडले; शंभरहून अधिक मेंढ्या ठार

SCROLL FOR NEXT