मकर संक्रांत (makar sankranti 2024) निमित्त नाशिक शहरातील आकाश आज (साेमवार) रंगबिरंगी पंतगांनी (kite) न्हाऊन गेले. दरम्यान अनेक ठिकाणी आजही नागरिकांनी नायलाॅनचा मांजाचा (nylon manja) वापर केल्याने या मांज्यात अडकून अनेक पक्षी जायबंदी झाले. आतापर्यंत ४ ते ५ पक्ष्यांचा तडफडून मृत्यू झाला तर काहींना वाचविण्यात यश आले आहे. (Maharashtra News)
नायलॉन मांजामुळे पक्षांसह नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होत असल्याने नाशिक पोलिसांची २१ भरारी पथके कार्यरत आहेत. या पथकाच्या माध्यमातून आत्तापर्यंत 14 विक्रेत्यांना नायलाॅन मांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तरी देखील आज नाशिकच्या अनेक भागात पंतग उडवण्यासाठी नायलाॅन मांजा वापरण्यात येत असल्याचे समाेर आले आहे.
नायलॉन मांजामुळे नाशिकरांची पतंगबाजीची हौस पक्षांसाठी मात्र कर्दनकाळ ठरली. नायलॉन मांजमुळे नाशकात अनेक पक्षी जायबंदी झालेत. आतापर्यंत ४ ते ५ पक्ष्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. नायलॉन मांजात अडकल्यानं अनेक पक्षांना गंभीर इजा देखील झाली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शहरातील वेगवेगळ्या भागात पक्षीप्रेमींकडून जखमी पक्षांच्या रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. नायलॉन मांजात अडकून जखमी झालेल्या पक्षांचे प्राण वाचविण्यात येत आहेत. नायलॉन मांजा पंखात अडकल्याने जखमी झालेल्या घारीचं वाईल्ड लाईफ सोसायटी या पक्षी मित्रांच्या संघटनेकडून रेस्क्यू करण्यात आले. दरम्यान नायलॉन मांजामुळे पक्षांसह काही नागरिक देखील जखमी झाल्याच्या घटना नाशिक शहरात घडल्या आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.