अभिजीत देशमुख
Dombivali News : सोशल मीडियावर रील काढून अपलोड करण्याची अनेकांना सवय आहे. अनेकदा हे रील्स बनवताना अपघात झाले आहेत. असाच एक प्रकार डोंबिवलीजवळील ठाकुर्लीमध्ये समोर आला आहे. डोंबिवली जवळील ठाकुर्ली येथील पंपहाऊसमधील खोल विहिरीत पडून एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बिलाल सोहिल शेख असं खोल विहिरीत पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बिलाल दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाउस येथे रील बनवण्यासाठी गेला होता. रील काढताना बिलाल विहिरीत पडला.
दरम्यान त्याच्या दोन मित्रांनी ही माहिती शनिवारी विष्णूनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी तरुणांचा शोध सुरू केला. तब्बल ३२ तासाच्या शोध मोहिमेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून तरुणाचा मृतदेह शोधून काढला आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे राहणारा 18 वर्षीय बिलाल सोहिल शेख हा दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाउस येथे रील काढण्यासाठी गेला होता. रील काढताना बिलाल विहिरीत पडला. मित्रांनी माहिती देताच रेल्वे सुरक्षा बलाने विष्णूनगर पोलिसांना कळवले.
विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाचा माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या पथकाने सदर ठिकाणी शोध कार्य सुरु केले. ३२ तास शोध कार्य सुरु होते. सोमवारी सायंकाळी बिलालाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना बाहेर काढण्यास यश आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.