डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय SaamTvNews
मुंबई/पुणे

डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

प्रदीप भणगे, सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमध्ये (Dombivli MIDC) एकूण ५२५ औद्योगिक भूखंड आहेत. तर ६१७ निवासी भूखंड आहेत. रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने रहिवासी भागांपासून प्रामुख्याने ५० मीटर अंतरावर असलेले १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत. हा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान कामा संघटनेने याला ठाम विरोध केला आहे.

हे देखील पहा :

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि वादाचा विषय ठरलेला धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतराचा मुद्दा अखेर संपुष्टात येणार आहे. राज्य सरकारने डोंबिवली (Dombivli) एमआयडीसी मधील तब्बल १५६ रासायनिक कारखाने दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिली. धोकादायक आणि अतिधोकादायक अशा कारखान्यांचा यात समावेश आहे. दरम्यान या निर्णायाच स्वागत डोंबिवली मधील नागरिकांनी केले आहे.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये (MIDC) एकूण ५२५ औद्योगिक भूखंड आहेत. तर ६१७ निवासी भूखंड आहेत. रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने रहिवासी भागांपासून प्रामुख्याने ५० मीटर अंतरावर असलेले धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत. दरम्यान, डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील सध्याचे धोकादायक कारखाने उत्पादनात बदल करून तिथे व्यापारी, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान संबंधी उत्पादने तयार करण्यास परवानी दिली जाणार आहे. कारखाने (Factory) स्थलांतरित होत असताना कामगार, पर्यावरण आदींबाबत योग्य निर्णय संबंधित विभाग घेतील, अशी देखील माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. 

मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी डोंबिवली औद्योगिक वसाहतीस भेट दिल्यानंतर येथील घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व उद्योग विभागाने केलेल्या पाहणीनुसार १५६ कारखाने रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात तसेच प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर येथील कारखाने इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलविण्यात येणार आहेत. दरम्यान या निर्णयाचे स्वागत डोंबिवली मधील नागरिकांनी केले असून हे फक्त कागदावरच राहू नये आणि नुसती घोषणे पुरते राहू नये, तर स्थलांतरित करावे असे नागरिकांनी सांगितले. दरम्यान या निर्णायाच स्वागत डोंबिवली मधील नागरिकांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Video: मुंबईच्या विजयानंतर रोहित रडला? ड्रेसिंग रुममधला तो व्हिडिओ व्हायरल

RTE Fees : 'आरटीई'च्या थकीत रक्कमेबाबत खंडपीठाकडून राज्य सरकारला विचारणा

True Love Test : तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरं प्रेम आहे की खोटं? 'या' हिंटने होईल स्पष्ट

Arvind Kejriwal: सुटका केल्यास काम करु शकत नाही... सुप्रीम कोर्टाचे अरविंद केजरीवाल यांच्याबाबत महत्वाचे विधान

Sayali Sanjeev: सायलीचं साडीतलं मराठमोळं सौंदर्य मनात भरलं

SCROLL FOR NEXT