Protest Against Bhandarli Dumping Ground प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Bhandarli Dumping Ground: १४ गावंतील ग्रामस्थांचे ठाणे महापालिकेविरोधात जनआक्रोश आंदोलन...

Bhandarli Dumping Ground: या निर्णयाला भंडार्ली (Bhandarli Gaon) ग्रामस्थांसह १४ गावातील सर्वपक्षीय विकास समितीने विरोध केला आहे.

प्रदीप भणगे

दिवा: ठाणे महापालिकेतील घनकरचा विल्हेवाटीसाठी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांमधील मौजे भंडार्ली येथे चार हेक्टर जागा ठाणे महानगरपालिकेने भाडे तत्त्वावर घेतली आहे. या निर्णयाला भंडार्ली (Bhandarli Gaon) ग्रामस्थांसह १४ गावातील सर्वपक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. असे असताना ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) भंडार्ली येथील जागेवर 10 जानेवारी रोजी कामाला सुरुवात केली. त्यामुळे भंडार्ली गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि रस्त्यावर उतरत ठाणे महापालिकेचा निषेध नोंदवला. मात्र हा प्रकल्प (Waste Depot) भंडार्ली गावात नको अशी मागणी असताना शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्याने ठाणे महापालिकेच्या विरोधात १४ गावातील आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी जनआक्रोश आंदोलन (Protest) केले आणि ठाणे महापालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या. (14 villages are strongly opposed to Bhandarli dumping ground and all parties have started agitation against Thane Municipal Corporation)

हे देखील पहा -

या आंदोलनसाठी माजी खासदार संजीव नाईक, पनवेल महापालिका उपमहापौर जगदिश गायकवाड, नगरसेवक बाबाजी पाटील, मनसे जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, संघर्ष समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, ज्ञानेश्वर येंदालकर, जीवन वालीलकर, गुरुनाथ पाटील, विजय पाटील, चित्रा बाविस्कर उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT