12 year old girl end her life Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

12 year old girl end her life At Bhosari : पिंपरी चिंचवडमध्ये एका १२ वर्षीय मुलीने आत्महत्या केलीय. रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून तिने हे धक्कादायक पाऊल उचललं असल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून बारा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

पिंपरी चिंचवडमध्ये एका १२ वर्षीय मुलीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना ५ जून रोजी घडली होती. परंतु तिने असे टोकाचे पाऊल का उचलले? याचं कारण कोणालाही समजलेलं नव्हतं. त्यामुळे आई-वडिल चिंतेत होते. त्यामुळे या मुलीच्या वडिलांनी तिच्या मृत्यूनंतर परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यांनी तिचा मोबाईल देखील (Pimpri Chinchwad News) तपासला.

टोकाचे पाऊल का उचलले?

परिसरातील सीसीटीव्ही आणि मोबाईल तपासल्यानंतर मुलीच्या पालकांच्या पायाखालील जमिन (Pune Crime News) सरकली. तिला दोन रोड रोमिओ त्रास देत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मुलीने जीवन संपवल्याची खात्री तिच्या वडिलांना पटली. तिच्या फोनमधून देखील हे धक्कादायक वास्तव त्यांच्या समोर आलं. त्यानंतर या मृत मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये दहशतीचं वातावरण

मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत गुन्हा (Pune News) नोंदवला. मुलीच्या वडीलाच्या तक्रारीवरून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोन आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केलीय. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठं दहशतीचं वातावरण आहे. शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या (Crime News) आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT