Breaking: रिक्त झालेल्या राज्यसभ जागेवर 12 'निलंबित आमदार' करू शकणार मतदान  Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: रिक्त झालेल्या राज्यसभ जागेवर 12 'निलंबित आमदार' करू शकणार मतदान

राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभ जागेवर भाजपचे 12 निलंबित आमदार मतदान करू शकणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई: राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभ जागेवर भाजपचे 12 निलंबित आमदार मतदान करू शकणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या आमदारांना मतदान करण्याची व्यवस्था करावी असे निर्ददश विधान भवन सचिवांना दिले आहेत. बारा आमदार निलंबित असल्यामुळे ते विधान भवनाच्या परिसरात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे १६ मे रोजी निधन झाले. त्यानंतर रिक्त झालेली जागेची पोटनिवडणूकीसाठी (By-Election) अर्ज भरण्याची आणि मागे घेण्याची तारीख निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची तारीख २२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पर्यंत असणार आहे. हा अर्ज महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावा लागणार आहे. आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता मुंबईत होणार आहे.

27 सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. जर निवडणूक लढविली गेली तर दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान होणार आहे. काँग्रेसकडून ओबीसी प्रश्न ऐरणीवर असल्याने ओबीसी उमेदवार देण्याची मागणी करण्यात येत आहे. सुरवातील निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते परंतु भाजपने उमेदवार दिल्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

Paneer Cutlet Recipe: छोट्या भूकेसाठी १० मिनिटांत बनवा खंमग पनीर कटलेट

Pune : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Brain improvement exercises: फोकस आणि स्मरणशक्ती वाढवायचीये? डॉक्टरांनी सांगितले मेंदूचे 3 सोपे व्यायाम, आजपासूनच करून पाहा

SCROLL FOR NEXT