mumbai crime news saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबई हादरली! आईस्क्रीम देतो सांगून मुलीला 'अंकल'ने घरी नेलं, अत्याचार केले; घृणास्पद कृत्याचा व्हिडिओही काढला

Girl Molested By Uncle: याप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षांच्या तरुणाला अटक केली.

Priya More

Mumbai Police: मीरारोड हत्याकांडाची (Mira Road Killed Case) घटना ताजी असतानाच मुंबई (Mumbai) आणखी एका घटनेने पुन्हा हादरली आहे. मुंबईमध्ये एका 9 वर्षांच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळच्या नातेवाईकानेच हे कृत्य केले आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आरोपीने हे घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये (Mobile Phone) शूट केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या नातेवाईकानेच 9 वर्षांच्या मुलीला आईस्क्रीम देतो सांगून नेले. त्यानंतर घरी नेऊन चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षांच्या तरुणाला अटक केली. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिला अंघोळ घातली. आरोपीने हे संपूर्ण घृणास्पद कृत्य मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी तिच्या कुटुंबासोबत राहते. आरोपी हा तिच्या घराशेजारी राहतो. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपीने मुलीला आईस्क्रीम देतो असे सांगून आपल्यासोबत घरी नेले. आरोपीशी ओळख असल्यामुळे मुलगी त्याच्यासोबत गेली. घरी पोहोचल्यावर आरोपीने मुलीच्या मानेवर चाकू ठेवला. चाकूचा धाक दाखवत त्याने तिच्यावर बलात्कार केला.

आरोपीने हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने मुलीला आंघोळ घालून तिचा पुन्हा व्हिडीओ तयार केला. हे व्हिडीओ गावातील तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची आणि कुणाला सांगितल्यास तिची बदनामी करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी धाव घेतली. रडत रडत तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

मुलीचा अवस्था आणि ती जे सांगते ते ऐकल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. तिला कोणतीही शारीरिक इजा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याला अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराशी संबंधित भादंवि कलम ३७६ (अ), ३७६(ब), ३७६, ३५४, ५०६(२) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, ६७ बी माहिती तंत्रज्ञान कलम ४, ६, ८ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना! म्हणत विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला | पाहा VIDEO

Pune Crime: मंदिरात घेऊन गेला, मंत्रोच्चार करत अघोरी विधी; अंगाऱ्याचा पेढा खायला दिला, नंतर महिलेसोबत...

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती, विवाहानंतर दोन महिन्यांतच सासरकडून छळ, तरुणीचा मृत्यू

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये जोरदार हाणामारी, बुक्क्यांनी एकमेकांना फोडलं |VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT