SSC Board Exam saam tv
मुंबई/पुणे

SSC Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेसंदर्भात बोर्डाने घेतला मोठा निर्णय

SSC Exam 2026 Date: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उचच माध्यमिक मंडळामार्फत घेण्याच्या येणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज करण्याचे मुदत वाढवून देण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्काह तुम्ही अर्ज भरु शकतात. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

याचसोबत पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खाजगी विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत अर्ज करायचे आहेच. तुम्ही https://www.mahahsscboard.in/mr या वेबसाइटवरुन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला विलंब शुल्कदेखील भरावे लागणार आहे. दरम्यान, तुम्हाला १७ नोव्हेंबरनंतर मुदतवाढ मिळणार नाहीये, असं मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या दहावीच्या मुलांनी अजूनही परीक्षेसाठी अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर भरावा.

दहावीच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च या कालावधीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतात. यावर्षीदेखील फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी अभ्यासदेखील सुरु केला आहे. परीक्षेसाठी अवघे काही महिने उरले आहेत.

दहावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय

दहावीच्या परीक्षेत कॉपी होण्याची शक्यता असते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कॉपी करु नये म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता परीक्षा केंद्रात प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करता येणार नाही. तरीही कॉपी करताना पकडले गेले तर संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

12 हजारांचं तिकीट, पण पदरी निराशाच; मेस्सीमुळे कोलकत्यात गोंधळ

19 Minute 34 Seconds Viral Video Link : 19 मिनिटांचा व्हायरल MMS VIDEO खरा की खोटा? महत्वाची माहिती आली समोर

सिडकोची १९,००० हजार घरांसाठी लॉटरी; मुदत १० दिवसांनी वाढवली,नवी मुबंईत कुठे असतील घरं?

बिबट्यांची बकऱ्यांची मेजवानी हुकणार? वनमंत्री गणेश नाईकांचा दावा हास्यास्पद?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ

SCROLL FOR NEXT