सातारा : आगामी काळात सातारा पालिकेची निवडणूक हाेणार आहे. पालिकेत सत्तेत असलेल्या खासदार उदयनराजे भाेसले यांच्या सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या दिवसांपासून सातारा आणि परिसरात विकासकामांचे उदघटान आणि भुमीपूजन केले जात आहे. या कार्यक्रमांना खासदार उदयनराजे भाेसले यांच्या उपस्थिती असते. दरम्यान या विकासकामांवरील काही कामांचा श्रेयवाद उफाळून आल्याचे आज (बुधवार) दिसून आले.
खासदार उदयनराजे भाेसले यांनी पोवई नाक्यावर "गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी" CRF निधीतून पोवई नाका ते वाढे फाटा या १५ कोटीच्या मार्गाचा प्रारंभ २२ तारखेला घेणार असल्याचा फलक शहरात लावला आहे. त्यांच्या या फलकास प्रतिउत्तर म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगरविकास आघाडीने त्याच्या बाजूलाच काम कुणाचं आणि नाचतय कोण? असा प्रश्न विचारत कधी तरी खरं बोला असा फलक लावला आहे.
नगरविकास आघाडीने लावलेल्या फलकावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या मागणीनुसार हे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याचे पत्र छापले आहे. हे दाेन्ही फलक सातारकरांच्या चर्चेचे विषय ठरले आहेत.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.