पंढरपूर मध्ये प्राचीन मुर्त्यांचे भरणार प्रदर्शन Bharat Nagane
मुख्य बातम्या

शेकडो वर्षांच्या पुरातन मुर्तींचे पंढरपूरात भाविकांना होणार दर्शन

विठ्ठल रुक्मिणी दर्शनाबरोबरच आता  भाविकांना पंढरपूर मध्ये पुरातन मुर्तींचा खजिना देखील पाहता येणार आहे.

भारत नागणे

पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात येतात. विठ्ठल रुक्मिणी दर्शनाबरोबरच आता भाविकांना शेकडो वर्षांपूर्वीच्या पुरातन मुर्तींचा खजिना देखील पाहता येणार आहे. Old Idols of Deities will be Displayed in Pandharpur

पूर्वीपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो लोकांचे पंढरपूर हे श्रद्धास्थान असल्याने ही मंडळी आपले देव विठ्ठल मंडईत आणून देत. येथे बैरागी कुटुंब गेल्या 18 पिढ्यांपासून या मूर्ती स्वीकारून त्याचे पूजन करत होते. नामदेव महाद्वार बांधण्यापूर्वी 1997 पर्यंत येथे 33 कोटी देवता मंदिर महाद्वारात होते.

हे देखिल पहा

बैरागी यांच्या 18 पिढ्या गेली 700 वर्षांपासून येथे या मूर्ती घेण्याचे व त्यांचे पूजन करायचे काम करीत होता. यानंतर महाद्वाराच्या बांधकाम करताना हे 33 कोटी देवता मंदिर पाडून या सर्व पुरातन मुर्ती मंदिर समितीने ताब्यात घेतल्या होत्या. याच मुर्त्या मंदिरातील एका खोलीत ठेवून त्याचे पूजन केले जात होते. Old Idols of Deities will be Displayed in Pandharpur

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व प्रशासनाने या मूर्तीं बाहेर काढून यातील अतिशय पुरातन आणि दुर्मिळ मूर्ती भाविकांना पाहता याव्यात यासाठी वेगळे दालन केले आहे. यात अनेक वर्षापूर्वीच्या कृष्ण, महादेव, गणेश, विष्णू, बालाजी, शाळीग्राम, यासह देवीच्या विविध रूपातील कोरीव पितळी व तांब्याच्या मूर्तींचा समावेश आहे.

यामध्ये गरुड, महिशा सुर मर्दिनी , रिद्धी सिद्धी, गणेश , पार्वती, महादेव अशा अनेक दुर्मिळ मुर्त्यांचा समावेश आहे. गोपालक कृष्णाच्या मूर्तीजवळ गाई उभ्या असलेली मूर्तीही अशीच देखणी आहे. Old Idols of Deities will be Displayed in Pandharpur

या मूर्त्यांसाठी विठ्ठल सभामंडपात एक दालन बनवले असून या दालनात या पुरातन मूर्ती भाविकांना पाहता येणार आहेत. कोरोनामुळे विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिर खुले झाल्यानंतर या देखण्या पुरातन मूर्ती पाहण्याचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

12th Student Suspended : युट्यूबवर पाहून बॉम्ब बनविला आणि थेट शिक्षकाच्या खुर्चीखाली केला विस्फोट, बारावीतल्या विद्यार्थ्यांचा कारनामा

Health Tips: धावपळीच्या जीवनात मन शांत आणि स्थिर ठेवायचे? फॉलो करा 'या' टिप्स

Tata Punch: फक्त 1 लाखात घरी आणा टाटाची दमदार कार; लोनवर किती भरावे लागेल EMI

Suryakumar Yadav: विराटची रिप्लेसमेंट मिळाली...दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर सूर्या काय म्हणाला?

Maharashtra News Live Updates: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

SCROLL FOR NEXT