Maharashtra Politics: हसन मुश्रीफांनी केला १२७ कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप  
मुख्य बातम्या

Maharashtra Politics: हसन मुश्रीफांनी केला १२७ कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील घोटाळे करणाऱ्या नेत्यांच्या यादीत आता राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रामनाथ दवणे

ठाकरे सरकारमधील, मंत्री अनिल परब, अनिल देशमुख, किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांच्यासह 11 लोकांची नावे मी घेतली होती. दुर्दैवाने या यादीत वाढ झाली आहे. असे म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील घोटाळे करणाऱ्या नेत्यांच्या यादीत आता राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव घेतले आहे. हसन मुश्रीफ यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. माझ्याकडे 2700 पानी पुरावे माझ्याकडे आहेत. ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पुरावे सादर केले आहेत, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

हे देखील पहा-

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबाबत डॉ. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलगा नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्याकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक बेनामी संपत्ती आणि कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतले. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.

तर, श्रीमती सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत. २००३ ते २०१४ या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.

या कारखान्याच्या नावावर जमा झालेल्या रकमा मरुभूमी फायनान्स कडून १५. ९० कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सी कडून ३५. ६२ कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपी कडून ४.४९ कोटी, नवरत्न असोसिएट्स कडून ४. ८९ कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस कडून ११.८५ कोटी, माऊंट कॅपिटल कडून २.८९ कोटी. तर, हसन मुश्रीफ यांनी परिवाराने सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT