Money 
महाराष्ट्र

नागवडे कारखान्याने काढले शेवटचे बिल

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : नागवडे कारखान्याकडे गेल्या वर्षीच्या हंगामात गेलेल्या ऊस बिलाची एफआरपीनुसारची अंतिम रक्कम प्रतिटन १४४.४० रुपयांप्रमाणे आज (सोमवारी) बँकेत ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

पत्रकात नागवडे म्हणाले, की गेल्या गळीत हंगामात कारखान्याने सात लाख दोन हजार पाचशे मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या हंगामात कारखान्याने यापूर्वी दोन टप्प्यांत दोन हजार तीनशे रुपये प्रतिटनाप्रमाणे बिले अदा केली आहेत. एफआरपीनुसार आता अंतिम दर काढला आहे. The Nagwade factory deposited the sugarcane payment in the bank

नागवडे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी राज्यातील ४५ साखर कारखाने बंद होते. त्यामुळे त्यापुढच्या गळीत हंगामातील एफआरपी निश्चिती करण्यासाठी राज्य शासनाने साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन केली होती. सदर समितीने कारखान्यांचे गाळप, उत्पादन खर्च, साखरेचा उतारा, ऊस तोडणी, वाहतूक खर्च आदी बाबींचा अभ्यास करून शासनास अहवाल सादर केला. त्यानुसार नागवडे कारखान्याची एफआरपी रक्कम दोन हजार ४४४ रुपये ४० पैसे प्रतिमेट्रिक टन एवढे निश्चित करण्यात आली. त्याप्रमाणे नागवडे कारखान्याकडून दहा कोटी १४ लाखांची रक्कम उद्या वर्ग होईल.

दोन वर्षांपूर्वी नागवडे कारखाना बंद असताना व सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे काम केले असतानाही कारखान्याने जिल्ह्यात दोन नंबरचा भाव दिलेला आहे. कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाकरिता घेतलेल्या कर्जाचा हप्ता व्याजासहित परतफेड केलेला आहे. दिवाळीत सभासदांना प्रत्येकी दहा किलो साखर वीस रुपये प्रतिकिलो प्रमाणे व कामगारांना पाच किलो साखर सवलतीच्या दराने वाटप करण्यात येणार असल्याचेही नागवडे म्हणाले. The Nagwade factory deposited the sugarcane payment in the bank

नागवडे म्हणाले, यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री दुरुस्तीची सर्व कामे झाली आहेत. बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम झाला आहे. १५ ऑक्‍टोबरदरम्यान कारखान्याचे गाळप सुरू करण्याची तयारी झाली आहे. कारखाना ऊस भावाबाबत कायम आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक व कारखाना व्यवस्थापनात विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT