Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates Saam TV Marathi
महाराष्ट्र

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : सोलापूरमध्ये खासदाराला जोरदार धक्का

Maharashtra ZP Election Results 2026 LIVE Updates : पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीचा निकाल आज जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदेचा कारभारी कोण होणार? याचं सर्व अपडेट एका क्लिकवर वाचा

Namdeo Kumbhar

LIVE Updates :  शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा सतीश पाटील विजयी

लोहारा तालुक्यातील कानेगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा सतीश पाटील विजयी

शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील यांच्या मातोश्री आहेत सुवर्णा पाटील

सुवर्णा पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती सभा

संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी ही ताकद लावली होती पण आला

खंडाळी गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खोमणे शितल विजयी भाजपाच्या रेखा हाके यांचा पराभव. राष्ट्रवादी शरद पवार गटाने खाते खोललं.

पुरंदर तालुक्यातील दिवे गराडे गटातून बापूसाहेब पठारे यांची मुलगी रूपाली झेंडे राष्ट्रवादीकडून विजयी

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates पलूस पंचायत समितीच्या कुंडल गणातून काँग्रेसच्या हेमा सुहास पवार 1831 मतांनी विजयी

Maharashtra ZP Election Results 2026 LIVE Updates :परभणी शेळगाव गट मधून श्रीकांत विटेकर विजयी

आमदाराला मोठा धक्का, मुलाचा दारूण पराभव

माळशिरस मध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना मोठा धक्का...

भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते अकराशे मतांनी विजयी झाले आहेत.

जिल्हा परिषद गटात भाजपच्या रश्मी बागल विजयी

पांडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या रश्मी बागल विजयी

रश्मी बागल या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात.

शरद पवार गटाच्या राणी माने यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे

Maharashtra ZP Election Results 2026 LIVE Updates :  परंडा तालुक्यातील शेळगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे अमर मोरे विजयी

सावंतवाडीत धक्कादायक निकाल

माडखोल जिल्हा परिषद सह दोन्ही पंचायत समितीवर अपक्षांनी मारली बाजी

शिवानी नाईक- माडखोल जि.प.

अवनी राऊळ- माडखोल पंचायत समिती

प्रथमेश सावंत- कलंबिस्त पंचायत समिती विजयी..

LIVE Updates :  भाजपला धक्का, जयकुमार गोरेंचे बंधू पिछाडीवर

माण तालुक्यातील कुकडवाड गटात मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे पिछाडीवर...राष्ट्रवादीचे अनिल देसाई 300 मतांनी आघाडीवर

परांडा मतमोजणी केंद्र जवळ कार्यकर्त्याचा जल्लोष सुरू

मतमोजणीची जशी प्रक्रिया सुरू झाली तसेच इकडे कार्यकर्ताचा उत्साह शिगेला जाताना पाहायला मिळत असून परांडा मतमोजणी केंद्राच्या जवळ कार्यकर्त्यांनी अक्षरशः जल्लोष करायला सुरुवात केली.

Sangli ZP Election Results 2026 LIVE Updates : सांगली जिल्हा परिषदेत काय स्थिती?

सांगली जिल्हा परिषद 61 गट निवडणूक निकाल - आघाडी

भाजपा - 10

राष्ट्रवादी अजित पवार - 02

शिवसेना शिंदे - 02

काँग्रेस - 01

राष्ट्रवादी शरद पवार - 01

शिवसेना ठाकरे गट -

सांगली 10 पंचायत समिती 122 गण- आघाडी

भाजपा - 05

राष्ट्रवादी अजित पवार - 02

शिवसेना शिंदे - 02

काँग्रेस - 02

राष्ट्रवादी शरद पवार - 01

शिवसेना ठाकरे गट - 00

 Kolhapur ZP Election Results 2026 LIVE Updates :कोल्हापूरच्या ६८ जागांवर कोण आघाडी, कोण पिछाडीवर? वाचा आकडेवारी

कोल्हापूर

जिल्हा परिषद- कोल्हापूर

एकूण जागा - 68

कल

भाजप - 6

शिवसेना (शिंदे) - 5

राष्ट्रवादी - 8

काँग्रेस - 10

शिवसेना (ठाकरे) -

जनसुराज्य - 3

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

इतर -

पंचायत समिती -

एकूण जागा - 136

कल - (किती जागांचा)

भाजप - 12

शिवसेना (शिंदे) - 10

राष्ट्रवादी - 16

काँग्रेस - 20

शिवसेना (ठाकरे) -

जनसुराज्य - 6

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 2

इतर -2

Dharashiv ZP Election Results 2026 LIVE Updates : धाराशिवमध्ये भाजपचा पहिला विजय

भारतीय जनता पार्टीचे काक्रंबा गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार दयानंद शिंदे विजयी

थेट विद्यार्थी चळवळीतून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरलेला युवा चेहरा विजयी

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे यांना उघडून भाजपने नव्या चेहऱ्याला दिली होती संधी

Dharashiv ZP Election Results 2026 LIVE Updates : धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बाजी, परांड्यात खाते उघडले

धाराशिव:

परंडा तालुक्यात शिंदे गटाने खाते उघडले

शिवसेना शिंदे गटाचे अमर सुभाषराव मोरे जिल्हा परिषद गटातून विजयी

रेश्मा गायकवाड शेळगाव विजय शिवसेना शिंदे गट पंचायत समिती गण

गणेश बापूराव भिलारे शेळगाव गण पंचायत समिती गण विजय

Latur ZP Election Results 2026 LIVE Updates : लातूरमध्ये मनसेचा दुसरा उमेदवार विजयी

पानगाव जिल्हा परिषद गटात मनसेचे सुनील नागरगोजे विजय, पंचायत समिती गणात मनसेच्या श्रीदेवी गालफड विजयी

Satara Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates :  सातारा पाटकळ गणातून राहुल शिंदे भाजप विजयी

ZP Election Results 2026 LIVE Updates : तुळजापूरमध्ये झेडपी अन् पंचायत समितीत भाजपचा विजय

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गटातून भाजपाच्या शीतल ढाले विजयी

जिल्हा परिषद व पंचायत समिती भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी

ZP Election Results 2026 LIVE Updates : शिंदेंच्या शिवसेनेने धाराशिवमध्ये खाते उघडले

धाराशिव जिल्ह्यातील ईटकुर जिल्हा परिषद गटातून

शिंदे यांची शिवसेना विजयी

शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत पिंटू लंगडे विजयी

Maharashtra ZP Election Results 2026 LIVE Updates : सांगलीत कोण आघाडीवर?

एकूण जागा - 61

भाजप - 6

शिवसेना (शिंदे) - 4

राष्ट्रवादी (अजित पवार) - 01

कॅांग्रेस - 01

शिवसेना (ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार) 01

इतर -

Maharashtra ZP Election Results 2026 LIVE Updates : सिंधुदुर्ग --- तरेळे पंचायत समितीवर भाजपाचा पहिला उमेदवार राजेश जाधव विजयी

Maharashtra ZP Election Results 2026 LIVE Updates :  सांगली.. जिल्हा परिषद खरसुंडी गटातून जयदीप भोसले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी

latur ZP Election Results 2026 LIVE Updates : लातूरमध्ये मनसेने खाते उघडले

पानगाव पंचायत समिती गटात मनसेच्या श्रीदेवी गालफाडे विजयी.. मनसेनं लातूरमध्ये खाते उघडले

साताऱ्यात भाजपला धक्का, राष्ट्रवादीने खाते उघडले

सातारा पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने खाते खोललं... भाजपला मोठा धक्का..

शिवथर गणातून राष्ट्रवादीचे राजेश पवार 376 मतांनी विजयी ...

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : लातूरमध्ये मनसे आघाडीवर

धाराशिव जिल्हा परिषदेतील पहिला कौल हाती

धाराशिव जिल्हा परिषदेतील पहिला कौल हाती

ढोकी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीवर

तीर्थराज गाडगे हे आघाडीवर

तर पंचायत समिती साठी उभाठा शिवसेने अमर समुद्रे 519 मतांनी विजयी

कणकवलीतील तरेळे पंचायत समितीवर भाजपाचा पहिला उमेदवार राजाराम जाधव विजयी

रत्नागिरी - रत्नागिरीत पावस जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेचे महेंद्र मांडवकर 300 मतांनी आघाडीवर

ZP Election Results 2026 LIVE Updates :  सिल्लोड तालुक्यातील अजिंठा पंचायत समिती गणात शिंदेची शिवसेना आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी :

६३ पैकी

भाजप : ६

शिवसेना : ४

शिवसेना UBT: २

NCP : ३

काँग्रेस : २

वंचित :

MIM:

अपक्ष :

Solapur ZP Election Results 2026 LIVE Updates : अजित पवारांच्या उमेदवाराचा विजय, राज्यातील पहिला कल राष्ट्रवादीच्या बाजूने

माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटात अजित पवाराच्या ncp च्या अश्विनी दळवे विजयी

Satara ZP Election Results 2026 LIVE Updates : कराडमध्ये मतमोजणी केंद्रावर राडा, पोलीस- उमेदवारामध्ये बाचाबाची

कराडला मतमोजणी केंद्रावर पोलीस आणि उमेदवारांच्यात बाचाबाची

दहा वाजता आलेल्या उमेदवाराला मतमोजणी केंद्रावर प्रवेश नाकारला

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा केला जाहीर निषेध

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला अडवले

निवडणूक निर्णय अधिकारी मनमानी करत असल्याचा थेट आरोप

Pune ZP Election Results 2026 LIVE Updates : भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची मुलगी विनया सुधीर मुंगसे आघाडीवर

Panchayat Samiti Election Results 2026 LIVE Updates : ठाकरे-शिंदेंमध्ये जोरदार टक्कर, रत्नागिरीत राजकीय वातावरण तापले

रत्नागिरी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीमध्ये

शिंदे शिवसेना- 88

ठाकरे शिवसेना- 95

भाजप- 30

अजित पवार गट राष्ट्रवादी- 37

काँग्रेस- 16

शरदचंद्र पवार गट- 1

मनसे- 6

बसपा- 9

ZP Election Results 2026 LIVE Updates : रत्नागिरीत शिंदेंची शिवसेना आघाडीवर, ठाकरेंना जोरदार धक्का

Kolhapur ZP Election Results 2026 LIVE Updates : गडहिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदारसंघात पहिल्या फेरीत जनसुराज्यचे अनिरुद्ध रेडेकर आघाडीवर

एकूण जागा - 68

कल

भाजप - 1

शिवसेना (शिंदे) -

राष्ट्रवादी - 2

काँग्रेस - 03

शिवसेना (ठाकरे) -

जनसुराज्य - 2

इतर -

पंचायत समिती - (पंचायत समितीचे नाव)

एकूण जागा - 136

कल किंवा निकाल - (किती जागांचा)

भाजप - 2

शिवसेना (शिंदे) -

राष्ट्रवादी - 4

काँग्रेस - 06

शिवसेना (ठाकरे) -

जनसुराज्य - 4

इतर -

Pune ZP Election result : आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद पाईट जिल्हा परिषद गटातून आघाडीवर

Pune ZP Election Results 2026 LIVE Updates : सुरूवातीच्या कलामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती टपाली मतमोजणीत अजित पवार राष्ट्रवादीची आघाडी.

-मावळ तालुक्यात टपाली मतमोजणी सुरुये

 parabhani ZP Election Results 2026 LIVE Updates : परभणीत कुणाचे किती उमेदवार आघाडीवर

शिवसेना शिंदे 2 आघाडीवर

शिवसेना ठाकरे 3 आघाडीवर

काँग्रेस 1 आघाडीवर

Solapur ZP Election Results 2026 LIVE Updates : आमदाराचा मुलगा पिछाडीवर, सोलापूरमध्ये मतमोजणीला सुरूवात

माळशिरस येथील 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणासाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरवातीला टपाली मतमोजणी सुरू झाली आहे.

दहिगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आणि शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांच्यामध्ये लढत होणार आहे.

Latur ZP Election Results 2026 LIVE Updates : लातूर तालुक्यात पहिल्या फेरीत काँग्रेस आघाडीवर

Kolhapur ZP Election Results 2026 LIVE Updates : कोल्हापूर जिल्ह्यात तीन ठिकाणी काँग्रेस आघाडीवर

उचगाव जिल्हा परिषद मतदार संघ आणि बावड्यात दोन ठिकाणी जिल्हा परिषद मतदार संघ आघाडीवर

Dharashiv ZP Election Results 2026 LIVE Updates : धाराशिव मतमोजणी केंद्रावर गोंधळ,पोलीस अन् उमेदरामध्ये राडा

धाराशिव मतमोजणी केंद्रावर गोंधळ

राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये गोंधळ

उमेदवार प्रतिनिधीला ही आत मध्ये सोडलं जात नसल्याचा आरोप

तासाभरापासून आम्हाला गेटवरच अडवला असल्याचा आरो

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आम्ही बाहेर आहोत

आम्हाला गेटवर ठेवूनच सत्ताधारी पक्षाकडून निकाल लावायचा आहे का संतप्त सवाल

ZP Election Results 2026 LIVE Updates : परभणीत ठाकरेंची सेना आघाडीवर

Kolhapur Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेस आघाडीवर

Pune Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर

उत्तर पुणे जिल्ह्यात टपाली मतदानात अजित पवार राष्ट्रवादीची आघाडी.

जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यात टपाली मतमोजणी सुरु

Pune Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : उत्तर पुणे जिल्ह्यात मतमोजणीला सुरवात

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असुन सुरवात झाली असुन टपाली मतमोजणी सुरु करण्यात आलीय पुढील दोन तासांत सर्व निकाल हाती येतील असा विश्वास निवडणूक आधिकारी अनिल दौंडे यांनी व्यक्त केलीय पुणे जिल्हात राष्ट्रवादी कॉग्रेस सत्ता राखणार का हे पहाणं महत्वाचे ठरणार आहे

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : मतमोजणीला सुरूवात, माणमध्ये भाजप उमेदवाराचा विजय

माण तालुक्यातील आंधळी गणातील भाजप उमेदवार अर्जुन काळे बिनविरोध

Kolhapur Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणीला सुरुवात

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणीला सुरुवात

सुरवातीला टपाली मतमोजणी सुरू

250 टेबलांवर सुरू झाली मतमोजणी

हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक 22 फेऱ्या होणार

मतदान केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

pune Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : बारामतीत टपाल मतमोजणीला सुरूवात झाली

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : १२ जिल्ह्यांत कुणाचा गुलाल उधळणार? मतमोजणीला सुरूवात

पुणे, सोलापूर, कोल्हापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडालाय. मतमोजणीला सुरूवात जाली आहे. थोड्याच वेळात कुणाकडे सत्तेच्या चाव्या असतील, हे स्पष्ट होणार आहे.

Satara Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : साताऱ्यात थोड्याच वेळात मतमोजणी ला सुरुवात

सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गट आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी सात तारखेला मतदान पार पडले आणि आज मतमोजणीला सुरुवात होत आहे, साताऱ्यातील एमआयडीसी परिसरातील शासकीय गोदामात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, साताऱ्यात चारही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, नेमका मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल

Parabhani Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : परभणी जिल्ह्यातील 54 जिल्हापरिषद आणि 108 पंचायत समिती गणासाठी थोड्या वेळात मतमोजणीला होणार सुरूवात

परभणी जिल्ह्यातील 54 जिल्हापरिषद आणि 108 पंचायत समिती गणासाठी आज मतमोजणी होणार आहे थोड्या वेळात ही मतमोजणी सुरू होणार आहे आपण पाहिले तर 54 जिल्हापरिषद जागेसाठी 247 उमेदवार रिंगणात होते तर 108 पंचायत समिती गणासाठी 433 उमेदवार रिंगणात होते ह्या सर्वांचे भविष्य आज ठरणार आहे जिल्हा 74.89 % मतदान झाले आहे आणि या मत मोजणी कडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे प्रशासनाच्या वतीने पुन्ह तयारी झाली असून केंद्र बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जिल्ह्यात 9 तालुक्यात मतमोजणी होणार आहे याचाच आढावा घेतला आहे

Maharashtra ZP Election Results 2026 LIVE Updates : थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरूवात

कराड तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट व 24 पंचायत समिती गणाच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार असून पंचवीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे

कराडच्या रत्नागिरी शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणी ची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी 230 कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे

मतमोजणी 25 फेऱ्यात पूर्ण होणार असून मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांचे उमेदवारांची प्रतिनिधी मतमोजणी ठिकाणी हजर आहे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या निवडणुकीला भावनिक किनार

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी बारामती मधील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार

सकाळी दहा वाजता होणार मतमोजणीला सुरुवात

बारामती मधील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणाच्या उमेदवारांच्या मतदानाची होणार मतमोजणी

जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीकरिता ४३ उमेदवार रिंगणात

,

जिल्हा परिषद गटामध्ये सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबूत ६ आणि नीरावागज ५ असे एकूण ३१ उमेदवार

सुपा २, काऱ्हाटी २ , शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबुत ७, कांबळेश्वर २, नीरावागज २, डोर्लेवाडी २ असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज निकाल

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर बहुमताचा कौल कुणाला मिळणार

मतमोजणी काहीच वेळात सुरुवात सुरुवात होई

जिल्ह्यात नऊ ठिकाणी मतमोजणी, 20 टेबल आणि 19 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी २ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

जिल्हा परिषदेचे 56 गटांसाठी 151 उमेदवार रिंगणात

112 पंचायत समिती गण - 321 उमेदवार रिंगणात

जिल्ह्यात 55.79 टक्के इतके झाले होते मतदान

मतदार कुणाला कौल देणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल

आज ठरणार झेडपीचे कारभारी... दहा वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी

सोलापूर जिल्हा परिषदेचे आजच्या मतमोजणीनंतर कारभारी ठरणार आहेत. आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.

जिल्हा परिषदच्या 68 जागांसाठी 271 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 485 उमेदवार रिंगणात आहेत.

Pune Zilla Parishad Live Update : पुणे जिल्हा परिषदेत असणाऱ्या चुरशीच्या लढाया

भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा या उत्रौली - कारी गटातून भाजपकडून मैदानात उतरल्या आहेत. त्यांचा सामना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी आहे.

शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढत आहेत.

जुन्नर तालुक्यातील बोरी - खोडद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सूनबाई कविता पवार यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला थेट आव्हान दिले आहे.

आंबेगावात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील आणि अरुण गिरे यांच्या अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्र लढत आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर लढत आहेत.

खेडमध्ये भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील यांच्या विरोधात आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद असून, शिंदेसेनेच्या निशा गोरे देखील रिंगणात आहे.

दौंड तालुक्यातील खडकी गटात दिवंगत माजी आमदार कृष्णराव जगदाळे यांचे पुत्र वीरधवल हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तसेच, बोरीपार्धी गटात माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे.

इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज भरणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे.

Maharashtra ZP Election Results 2026 LIVE Updates :जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतमोजणीला काही वेळात सुरूवात

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठी 299 उमेदवार तर पंचायत समितीच्या 146 जागांसाठी 528 उमेदवार रिंगणात होते या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीतुन समोर येणारच आहे मात्र यावेळी मतदानाचा वाढलेला टक्का आणि पक्षीय बलाबल यामुळे याचा फायदा कुनाला होणार याकडे सर्वाचे लक्ष असुन अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पुणे जिल्ह्यात सहानुभूतीची होती याचा थेट फायदा राष्ट्रवादी कॉग्रेसला होणार हेही पहाणं महत्वाचे ठरणार आहे

Zilla Parishad Election Result : पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी याच मतमोजणी परिसरात गोंधळ झाला होता. पोलिसांनी लाठीचार केला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून या मतमोजणी केंद्राच्या परिसरातला हॉटेल विक्स ते गाडी चौक हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. पोलिसांचा मोठा पाऊस फाटा तैनात करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दहा जिल्हा परिषद सर्कल आणि 20 पंचायत समिती गणासाठी झालेल्या मतांची या ठिकाणी मोजणी होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते समर्थक येतील अशी शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

Kolhapur ZP Election Results 2026 LIVE : कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला निकाल बारा वाजेपर्यंत

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजता सुरू होईल. दोन फेऱ्यांमध्ये एका गटाचा निकाल हाती येईल. सर्वसाधारणपणे दुपारी १२ वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्यातील एक ते दोन गटांचे निकाल जाहीर होतील. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली असून, २५० टेबलांवर १८८ फेऱ्या होणार आहेत. हातकणंगले तालुक्यात २२ फेऱ्या, तर उर्वरित सर्व तालुक्यांत १० ते १५ फेऱ्यांमध्ये निकाल हाती येईल. जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शनिवारी चुरशीने मतदान झाले. मतांची टक्केवारी जरी गेल्या वेळेपेक्षा कमी झाली असली, तरी राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचली आहे. त्यामुळे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.

ZP Election Results 2026 LIVE : मिनी मंत्रालयाचा फैसला आज; १२ जिल्ह्यांत कुणाचा गुलाल उधळणार?

राज्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारी दोन वाजेपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा कारभारी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिल्लीच्या ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Valentine Special Cake : तुमच्या पार्टनरसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी गुलाब फ्लेवर केक, वाचा सोपी रेसिपी

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam : 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी...' ला मिळाले घवघवीत यश; निर्मात्यांनी सीक्वलची घोषणा करत दिलं मोठं सरप्राइज

IND vs PAK: पाकिस्तान सुधारणार नाही... भारतासोबत खेळण्यासाठी घातल्या नव्या अटी, वाचा नेमकं काय म्हणाले

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याला चकाकी, १० तोळे २२,४०० रुपयांनी महागले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT