लोकशाहीच्या सणाला प्राधान्य देत लातूरच्या गरसुली येथे एका नवरदेवाने आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाआधी मतदानाचा हक्क बजावल्याचे प्रेरणादायी चित्र आज पाहायला मिळाले. लग्नसोहळ्यासाठी भोल्यावर चढण्याआधी नवरदेव थेट मतदान केंद्रावर पोहोचला आणि आपला मतदानाचा हक्क बजावला .
लग्नाची धामधूम, नातेवाईकांची वर्दळ आणि शुभमुहूर्ताची घाई असतानाही “आधी मतदान, मग लग्न” हा संदेश देत नवरदेवाने समाजासमोर आदर्श ठेवला. मतदान करून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता.
या अनोख्या कृतीचे मतदान केंद्रावर उपस्थित अधिकारी व नागरिकांनी कौतुक केले. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे, असा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे.
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.ईश्वरपूर नजीक असणाऱ्या साखराळे या त्यांच्या गावा मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.रांगेत उभे राहुन आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगलं यश मिळेल,असं मत यावेळी जयंत पाटलांनी व्यक्त केले.
माळशिरस तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गणासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे अकलूज जवळच्या यशवंत नगर मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली आहे.
तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये पुन्हा एकदा माजी आमदार राम सातपुते आणि आमदार उत्तम जानकर आमने-सामने आले आहेत येथून राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते व आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांच्यामध्ये सर लढत होत आहे येथील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीला सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे, लातूरच्या बाभळगाव येथे देशमुख कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला , यावेळी, स्वर्गी विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख,काँग्रेस नेते तथा माजी आमदार धीरज देशमुख, दीपशिखा देशमुख यांनी त्यांच्या मूळ गावी बाभळगाव येथे मतदानाचा हक्क बजावला, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान करण्याचा अहवाल देखील यावेळी करण्यात आलं
रोहित पवार मतदान केंद्रावर दाखल
मतदानाचा हक्क बजावला
सुनंदा पवार, राजेंद्र पवार, कुंती पवार, मतदानासाठी दाख
छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी आपल्या गावी पाचोड येथे मतदानाचा हक्क बजावला. पाचोड येथील जिल्हा परिषद गटात त्यांचे पुतणे शिवराज भुमरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. खासदार संदिपान भुमरे यांच्यासाठी पैठण तालुक्यातील पाचोड जिल्हा परिषद गटाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरलेली आहे.
पुण्याच्या भोरमधील भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सपत्नीक मतदान केंद्रावर येत बजावला मतदानाचा हक्क..
भोर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी हातनोशी येथील मतदान केंद्रावर येऊन पत्नी स्वरूपा थोपटे यांच्यासह येत मतदानाचा हक्क बजावलाय..
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे ह्या भोरमधील उत्रौली - कारी गटातून जिल्हा परिषद निवडणूकी साठी रिंगणात आहेत..
यंदा पहिल्यांदाचं त्या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत..राष्ट्रवादीचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या विरोधात त्या निवडणूक लढवत आहेत..
तर पत्नी जरी पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या असल्यातरी थोपटे कुटुंब अनेकवेळा निवडणूकांच्या रिंगणात उतरले आहेत.. त्यामुळे ही निवडणूक थोपटे कुटुंबासाठी नवीन नाही....
त्यामुळे ही लढत त्याच्या अतिशय चुरशीची होणार आहे .
पंढरपुरच्या माळशिरसच्या यशवंतनगर मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन पडले बंद......
सुमारे 40 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंद पडले होते.....
मतदार रांगेत ताटकळत उभारले.......
जवळपास 40 मिनिटांनी बंद पडलेले ईव्हीएम मशीन सुरू झाले.....
रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील सती चिंचघरी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद
चिपळूण अलोरे जिल्हा परिषद गटातील प्रकार
गेल्या अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प
नवीन मशीन आली मागवण्यात
ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.
परभणीच्या राणीसावरगाव मध्ये मतदान करण्यापासून रोखल्यामुळे मतदान केंद्रावर वाद झाला आहे महंतांनी थेट मतदान केंद्र अधिकार्यावर भाजपाची दलाली करत असून आपल्याला मतदानापासून रोखले असल्याचा आरोप केलेला आहे यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील हा वाद चालूच होता दरम्यान महंत मतदान न करताच मतदान केंद्रावरून बाहेर पडले आहेत दरम्यान हा वाद सकाळी सकाळी झाला असल्याने चर्चेला उधाण आले आहेव
कराड तालुक्यातील चचेगाव येथे ईव्हीएम मशीन सुरू होईना
सुरुवातीलाच ईव्हीएममुळे मतदानाला उशीर
बुथ क्रमांक 78 वरील मशीन बंद
काँग्रेस आणि भाजप उमेदवार या ठिकाणी मोठी चुरस
मतदान केंद्रावर झोनल अधिकारी दाखल
छत्रपती संभाजी नगरच्या पिसादेवी येथील बुथ क्रमांक 15 मधील खोली क्रमांक पाच मध्ये असलेले ईव्हीएम मशीन बंद
ईव्हीएम मशीन खराब झाल्याने मतदानाला सुरुवात नाही
सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड
मतदान सुरुवात न झाल्यामुळे बुध क्रमांक पंधरा वरील खोली क्रमांक पाच बाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा
अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी तयारी सुरू
रायगडच्या अलिबाग मध्ये मतदान यंत्रात बिघाड
सहाण येथील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच बिघाड
8 वाजले तरी मतदान सुरू नाही
यंत्र दुरुस्तीसाठी टेक्निकल टीमला पाचारण करण्यात आले आहे
सकाळ पासून इथ मतदारांच्या रांगा, मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत
सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आणि 11 पंचायत समितीच्या 145 जागांसाठी आज सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणासाठी ही मतदान सुरू झाले आहे. पंढरपुरात 309 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी 1700 कर्मचारी तैनात आहेत. पंढरपूर तालुक्यात सुमारे 2 लाख 85 हजार मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चुरस आहे.
जिल्हा परिषद पाच आणि पंचायत समिती दहा जागांसाठी एकूण 15 उमेदवारांसाठी आज मावळ मध्ये मतदान संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर आज सकाळी साडेसात वाजता पासूनच नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केलेली आहे. आम्ही केलेल्या कामाच्या विश्वासावरच आम्हाला मायबाप जनता निवडून देईल असा आत्मविश्वास भागवत यांनी व्यक्त केला..
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत पुन्हा शाईचा वापर
महापालिकेत मार्कर पेनने लावलेली शाई पुसल्याचे प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक विभागाचा निर्णय
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज पार पडतेय मतदान प्रक्रिया
मतदान प्रक्रियेत मार्कर पेन वर बंदी करून शाईचा वापर सुरू केल्याने मतदारांनी केलं स्वागत स्वागत
परभणी जिल्ह्यातील 54 जिल्हापरिषद आणि 108 पंचायत समिती गाण्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या साठी प्रशासन सज्जन झाले आहे .कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
54 जागेसाठी 247 उमेदवार रिंगणात आहेत तर पंचायत समितीच्या 108 गणा साठी 433 उमेदवार रिंगणात आहेत जिल्हापरातील 1278 केंद्रावर मतदान प्रक्रिया होत आहे सकाळी 7:30 पासून 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार असून या सर्व उमेदवाराचे भवितव्य आज मतदानाच्या रूपात मत पेटी मध्ये बंद होणार आहे.
सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले असून मतदार केंद्रावर काही प्रमाणात रांगा लागलेल्या पाहायला मीळत आहेत मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून १०० मीटरच्या बाहेर वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ५० व पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ही निवडणूक होत असली तरी 8 जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत तर पंचायत समितीचे 17 सदस्य निवडून आले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 42 तर पंचायत समितीच्या 83 जांगासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
पिंपळी या मतदान केंद्रावर , रोहित पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार हे करणार पिंपळी या ठिकाणी मतदान
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात
1308 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया तर 11 लाख 45 हजार 888 मतदार बजावणार हक्क
जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी 234 उमेदवार रिंगणात तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी 393 उमेदवार रिंगणात
जिल्ह्यातील मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त,
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदाना प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी प्रशासन आता सज्ज झाले आहे. 61 जिल्हा परिषद गटासाठी 211 आणि 122 पंचायत समिती गणासाठी 327 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 18 लाख 18 हजार 742 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 39 मतदान केंद्रे आणि 9 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली .
श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, शर्मिला पवार मतदान करण्यासाठी काटेवाडी मध्ये दाखल
बजावणार जिल्हा परिषदेच्या मतदानाचा अधिकार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काटेवाडीत बजावणार मतदानाचा हक्क
बारामती मध्ये यंदा मतदान अजित दादांच्या विना
उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं पहिलं मतदान
सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य बजावणार काटेवाडी मध्ये निवडणूक
आज पार पडणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असून. रायगड जिल्ह्यात एकूण 17 लाख 381 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 2323 मतदान केंद्र तैनात करण्यात आली आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीकरिता 59 जागांसाठी 173 उमेदवार रणांगणात असून पंचायत समिती साठी 118 जागांकरिता 329 उमेदवार रिंगणात उतरलेत. त्यासाठी 12 हजार हून अधिक शासकीय कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झालेत.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या यजमानावर जीवघेणा हल्ला
पुण्याच्या खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या यजमानावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शरद बुट्टे पाटील यांनी काही दिवसापूर्वीच भाजपातून अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
या हल्ल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गटनेते शरद बुट्टे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
शरद बुट्टे हे आपल्या खासगी कामानिमित्त बाहेर गेले असता दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात असून, हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले.
बारामती तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणाकरिता मतदान
जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीकरिता ४३ उमेदवार रिंगणात
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदार संख्या पुरुष १ लाख ३५ हजार ७३, महिला १ लाख २९ हजार ५६०, इतर ९ असे एकूण २ लाख ६४ हजार ६४२
जिल्हा परिषद गटामध्ये सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबूत ६ आणि नीरावागज ५ असे एकूण ३१ उमेदवार
सुपा २, काऱ्हाटी २ , शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबुत ७, कांबळेश्वर २, नीरावागज २, डोर्लेवाडी २ असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान
जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत करता येणार मतदान
एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला तर 468 इतर मतदारांचा समावेश
प्रचार, भव्य सभा, रॅली किंवा शक्तिप्रदर्शन न होता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली
तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी मात्र तालुक्यात दुःखद वातावरण
काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे
अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक अपक्षांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत पाठिंब्याची पत्रे राष्ट्रवादीला सादर केली
मतदारांचा कौल कोणाला असणार याकडे साऱ्यांचे लक्ष
बारामती जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीकरिता ४३ उमेदवार रिंगणात
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदार संख्या पुरुष १ लाख ३५ हजार ७३, महिला १ लाख २९ हजार ५६०, इतर ९ असे एकूण २ लाख ६४ हजार ६४२
,
जिल्हा परिषद गटामध्ये सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबूत ६ आणि नीरावागज ५ असे एकूण ३१ उमेदवार
सुपा २, काऱ्हाटी २ , शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबुत ७, कांबळेश्वर २, नीरावागज २, डोर्लेवाडी २ असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.