Zilla Parishad Nashik Saam Tv News
महाराष्ट्र

Nashik: महिला कर्मचाऱ्यांवर प्रेमाचे जाळे अन् शोषण; ३० जणींसोबत विभागप्रमुखाकडून दुष्कृत्य, नाशिक हादरलं

Nashik Zilla Parishad Crime News: नाशिक जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक व मानसिक छळाच्या तक्रारी केल्या असून, विशाखा समितीमार्फत चौकशी सुरू झाली आहे.

Bhagyashree Kamble

नाशिक जिल्हा परिषदेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ करत असल्याची बाब समोर आली आहे. या बाबतची माहिती पीडित महिलांनी विशाखा समितीकडे दिली. त्यांच्याकडे १ -२ नव्हे तर, एकूण ३० महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सध्या विशाखा समितीकडून तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, गेल्या दोन कार्यकाळांपासून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महिला असूनही, परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तक्रारीनुसार, संबंधित अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये बराच काळापासून कार्यरत असून, पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत असल्याचा आरोप आहे. सुरुवातीला बऱ्याच महिला भीतीपोटी मौन बाळगत होत्या, मात्र एका पीडितेने तक्रार दाखल केली. त्यानंतर इतर महिलांनीही पुढे येत आपबिती सांगितली.

आतापर्यंत १ - २ नव्हे तर, तब्बल ३० महिलांच्या तक्रारी विशाखा समितीकडे प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित महिलांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी सांगितले की, 'काही महिलांकडून पुराव्यानिशी लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत विशाखा समितीला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी समितीच्या अहवालात तथ्य आढळल्यास संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल', असं त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

SCROLL FOR NEXT