ZP Election  Saam tv
महाराष्ट्र

ZP Election : २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात, निवडणुकीची घोषणा कधी होणार? जाणून घ्या

Election Commission press conference : राज्यातील १२ ठिकाणी जिल्हापरिषदांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. उर्वरिरत २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत.

Vishal Gangurde

राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झालीये

राज्यातील उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका आरक्षण आणि न्यायालयीन प्रकरणामुळे रखडल्यात

दहावी-बारावी आणि शालेय परीक्षा असल्याने निवडणुकीला विलंब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे

पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी असेल. राज्यात आणखी २० जिल्हा परिषदा आणि उर्वरित पंचायत समितीच्या निवडणुका दुसर्‍या टप्प्यात पार पडणार आहेत. पण दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका कधी लागणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका का लांबल्या ?

५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे प्रकरण कोर्टात गेले होते. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळेच २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्या आहेक. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वाधिक आहेत. या झेडपीमधील आरक्षणाचा गुंता सुटल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाहीत, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार?

२० जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत. त्यातच १० आणि १२वीच्या परिक्षा होणार आहेत. त्याशिवाय शाळेमधील वार्षिक परीक्षाही होणार आहेत. त्यामुळे २० जिल्हा परिषदेच्या या निवडणुका मे अथवा जूनपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्हापरिषदांच्या निवडणुका? आरक्षण मर्यादा टक्केवारीमध्ये

नंदुरबार - १०० टक्के

पालघर - ९३ टक्के

गडचिरोली- ७८ टक्के

नाशिक- ७१ टक्के

धुळे - ७३ टक्के

अमरावती - ६६ टक्के

चंद्रपूर - ६३ टक्के

यवतमाळ - ५९ टक्के

अकोला - ५८ टक्के

नागपूर - ५७ टक्के

ठाणे - ५७ टक्के

गोंदिया - ५७ टक्के

वाशिम - ५६ टक्के

नांदेड - ५६ टक्के

हिंगोली - ५४ टक्के

वर्धा - ५४ टक्के

जळगाव - ५४ टक्के

भंडारा - ५२ टक्के

लातूर - ५२ टक्के

बुलढाणा - ५२ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT