दिलासा! तब्बल 16 महिन्यानंतर नागपुरात शुन्य कोरोना रुग्ण आणि मृत्यू
दिलासा! तब्बल 16 महिन्यानंतर नागपुरात शुन्य कोरोना रुग्ण आणि मृत्यू  Saam TV
महाराष्ट्र

दिलासा! 16 महिन्यानंतर नागपुरात 'शुन्य' कोरोना रुग्ण आणि मृत्यू

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपूरात (Nagpur) तब्बल 16 महिन्यानंतर कोरोना रुग्ण (Coronavirus) आणि मृत्युचा आकडा शून्य झाला आहे. नागपूरची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे. राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका असताना रुग्णसंख्या शून्यावर आल्यानं नागपूरकारांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 24 तासात शहर आणि ग्रामीण मध्ये कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यु संख्या शून्य असल्याते आढळून आले आहे. एकूण 4 हजार 394 तपासण्यापैकी एकही रुग्ण संक्रमित आढळला नाही. सध्या स्थितीत नागपूरात 70 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

दरम्यान काल राज्यात काल 3,187 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. 3,253 रुग्णांनी कोरोनावरती काम केली आहे. राज्यात काल 49 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 36,675 रुग्ण अॅक्टिव आहेत. आतापर्यंत 65,47,793 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी 63,68,530 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. तब्बल 1,39,011 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.राज्यात 5,88,84,819 नागरिकांचा कोरोनाची चाचणी झाली आहे. राज्यात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरीही तिसऱ्या लाटेच्या दृष्टिने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात दुसऱ्या लाटेच्या दरम्यान जास्त प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेबरचा ताण कमी झाला आहे.

राज्यात नुकताच पार पडलेला गणपती उत्सव आणि येणार नवरात्र, दसरा उत्सवामुळे राज्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारच्या वतीने ऑक्सिजन आणि बेडची तयारी झाली असल्याची माहिती राज्यातील सत्ताधारी देत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT