हृदय दिनीच डाॅक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. काल जागतीक ह्रदय दिनी डॉक्टरांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदय दिनीच डाॅक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने  मृत्यू
हृदय दिनीच डाॅक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूSaam TV

सांगली: सांगली-मिरज (Sangali MiraJ Road) रस्त्यावरील एका जीम मध्ये व्यायाम करत असताना ह्रदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आल्याने डॉ. अशोक महावीर धोंडे वय ४७ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. काल जागतीक ह्रदय दिनी डॉक्टरांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदय दिनीच डाॅक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने  मृत्यू
अटकेच्या भीतीने परमबीर सिंग यांनी देश सोडला?

डॉ. धोंडे यांचा सिव्हिल हॉस्पीटलच्या समोर दवाखाना आहे. ते एमडी सर्जन होते. गेल्या काही दिवसापासून सांगली-मिरज रस्त्यावरील एका जीममध्ये व्यायाम करण्यासाठी नित्याने येत होते. आज सायंकाळी ते जीममध्ये आले. थोडावेळ व्यायाम केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर चक्कर येऊन उलटी झाली.

बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तातडीने जवळील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, त्यानंतर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. डॉ. धोंडे यांच्या संपर्कातील अनेक डॉक्टर रुग्णालय परिसरात जमले होते. ह्रदय दिनी मृत्यू झाल्‍याने हळहळ व्यक्त करण्यात आली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com