दूषित पाणी पुरवठ्या बाबत पालिका प्रशासना विरोधात युवासेना आक्रमक भूषण अहिरे
महाराष्ट्र

दूषित पाणी पुरवठ्या बाबत पालिका प्रशासना विरोधात युवासेना आक्रमक

आज महिला युवा सेना तर्फे महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दूषित पाणी भेट देऊन पालिका प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे - शिंदखेडा Shindkheda तालुक्यातील दोंडाईचा शहरात गेल्या एक महिन्यापासून महानगरपालिका प्रशासनातर्फे पुरवठा केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यामधून Water मोठ्या प्रमाणात गाळ तसेच जंतूयुक्त पाणी नागरिकांना मिळत असल्यामुळे या दूषित पाण्यातून रोगराई पसरली जात असून दोंडाईचाकरांचे आरोग्य Health प्रदूषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे. आज महिला युवा सेना तर्फे महानगरपालिका प्रशासनाच्या Municipal administration अधिकाऱ्यांना दूषित पाणी भेट देऊन पालिका प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. Yuvasena aggressive against municipal administration regarding contaminated water supply

हे देखील पहा -

पालिका प्रशासनाने लवकरात लवकर दूषित पाण्याचा पुरवठा थांबवित जंतुवीरहित पाण्याचा पुरवठा नागरिकांना करावा अशी मागणी या निवेदनातून युवा सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच पालिका प्रशासनाने युवासेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देखील युवा सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

यावेळी मोठ्या संख्येने युवा सेनेच्या महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होत्या.पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित पणाच्या विरोधामध्ये युवा सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : पुढील ८ ते ४८ तासांत कोकण-गोव्यासह १९ राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

तस्करांचा माल सोडण्यास नकार; DRIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट 'दाऊद गँग'च्या नावाने धमकी, मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT