yuva sena agitation in satara saam tv
महाराष्ट्र

Satara: हेच का अच्छे दिन? माेदी-शहांचा निषेध नाेंदवत युवा सेनेचा थाळी नाद

आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर युवा सेनेनं आंदाेलन छेडलं.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : पेट्रोल, डिझेल, गॅस,खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढ करून महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी (narendra modi) सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. वाढत्या महागाई बद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी आज युवा सेना (yuva sena) यांच्या माध्यमातून सातारा (satara) येथे थाळी, ताली बजाव वाजवुन आदोंलन छेडण्यात आले. (yuva sena latest marathi news)

"अच्छे दिन" ,पेद्रोल डिझेल के दाम कम हुवे की नही हुवे ? घरेलू ग्यास के दाम कम हुवे की नही हुवे ? अच्छे दिन आये की नही आये असे म्हणत सातारा जिल्हा युवा सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या जुमलेबाज सरकारचे आभार मानत आंदाेलन छेडले.

इंधन दरवाढ करून महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणाऱ्या व जुमलेबाज केंद्रातील नरेंद्र मोदी व अमित शहा सरकारचा थाळी वाजवून युवा सेनेच्या जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी आभार मानत अनाेखे आंदाेलन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, उपजिल्हा प्रमुख युवा सेना नवनाथ पाटील, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख संभाजी पाटील, माथाडी कामगार सेना जिल्हा प्रमुख प्रशांत शिंदे, तालुका प्रमुख महेश शिर्के, जिल्हा सचिव विद्यार्थी सेना मनोज पवार, फलटणचे माऊली पिसाळ, निवास महाडिक, तुषार घोरपडे आदी कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT