Akola News, NEET UG 2023 Result, Yukta Ambhore
Akola News, NEET UG 2023 Result, Yukta Ambhore saam tv
महाराष्ट्र

Success Story : कष्टकरी कुटुंबातील युक्ताला Youtube ची मिळाली साथ, Neet परीक्षेत मिळविले उज्जवल यश

जयेश गावंडे

Akola News : अकोल्यातील कौलखेड येथील कष्टकरी कुटुंबातील युक्ता राजेश अंभोरे (yukta rajesh ambhore) हिने कुठलीही शिकवणी न लावता केवळ यु ट्युबवरील प्रशिक्षण घेत NEET UG परिक्षेत भरघाेस यश मिळविले आहे. सामाजिक कार्यकर्ते (कै.) राजेश अंभोरे यांची कनिष्ठ कन्या असलेल्या युक्ताने जिद्दीने मिळविलेल्या यशाचे काैतुक ग्रामस्थांसह विविध सामाजिक, राजकीय संघटना करु लागल्या आहेत. (Maharashtra News)

मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या NEET UG 2023 या प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीवर मात करत मोठया जिद्दीनं यश मिळवले आहे.

अकोला शहरातल्या कौलखेड भागात राहणाऱ्या युक्तानेही या परीक्षेत मिळवलेलं यश हे सध्या संपूर्ण शहरात कौतुकाचा विषय बनलंय. कष्टकरी कुटुंबात वाढलेल्या युक्ताच्या वडिलांच्या निधनानंतर तिला आई आणि भावाचा शिक्षणासाठी खंबीर पाठींबा मिऴाला.

युक्ताची आईने घर सांभाळत लोकांची धुणी भांडी करून तिला शिकवलं. तिचाभावानेही आपली बहीण डॉक्टर व्हावी यासाठी मोलमजुरी करून तिला शिकवण्यासाठी हातभार लावला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने युक्ताने नीट परिक्षेसाठी काेणाता क्लास लावला नाही. केवळ youtube च्या माध्यमातून तिने नीटचा अभ्यास केला. त्या जाेरावर तिने परिक्षेत उज्जवल यश मिळविले.

युक्ताने नीट परीक्षेत 580 गुण मिळविले आहेत. तिला 97.23 टक्के गुण मिळाले आहेत. इयत्ता बारावीत तिने 86 टक्के व दहावीत 92 टक्के गुण मिळविले होते. तिने कोणत्याही प्रकारची शिकवणी वर्ग न लावता केलेला अभ्यास आणि मिळविलेले यश या तिच्या जिद्दीचे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काैतुक करण्यात आले. युक्ताच्या पुढच्या शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन काॅंग्रेस (congress) प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी काैतुक साेहळ्याप्रसंगी दिले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रत्नागिरीत सीएनजीचा मोठा तुटवडा

Sanjay Raut: निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होणार; PM मोदी- राज ठाकरेंच्या सभेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनर उलटला, दोघांचा जागीच मृत्यू

Melghat Water Scarcity: मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

Cannes Festival 2024 : हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याची कान्स रेड कार्पेटवर रुबाबत एन्ट्री, लेक आराध्याचं होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT