Birhad Morcha : 'न्याय द्या...न्याय द्या... सीएम साहेब न्याय द्या'; बिऱ्हाड माेर्चाची ठाण्याच्या दिशेने चाल

बिऱ्हाड मोर्चा शहापूर तालुक्यातील खर्डी येथे मुक्कामी होता.
birhad morcha
birhad morchasaam tv
Published On

- फय्याज शेख

Birhad Morcha News : हजारो आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा ठाण्याच्या दिशेने आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास रवाना झाला. विविध मागण्यांची सरकारने पुर्तेता करावी यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा माेर्चा नाशिकहून काढण्यात आला आहे. बि-हाड मोर्च्याचा आजचा चौथा दिवस आहे. (Maharashtra News)

birhad morcha
Pandharpur News : भाविकांनाे ! आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरात 'ही' दर्शन सेवा राहणार बंद

मंगळवारी 13 जून रोजी गोल्फ क्लब मैदानातून हा माेर्चा निघाला होता. गुरुवारी माेर्चेकरांनी ठाणे जिल्ह्यात प्रवेश केल्यावर त्यांनी मुंबई- नाशिक महामार्गावर (mumbai nashik highway) तीन ठिकाणी महामार्गवरील वाहतुक रोखून धरली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. संध्याकाळी बिऱ्हाड मोर्चा शहापूर तालुक्यातील खर्डी येथे मुक्कामी होता.

birhad morcha
Pune School Reopen: पुण्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांवर कटू प्रसंग, फी न भरल्याने व्यवस्थापनाने दाखविला बाहेरचा रस्ता

आज पुन्हा सकाळपासून हा मोर्चा ठाण्याच्या दिशेने पुढे पायी निघाला आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बिऱ्हाड मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने चालत राहाणार असल्याची भूमिका या मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.

birhad morcha
Wardha Bogus Seeds Factory : वर्ध्यातील बोगस बियाणे कारखान्यात महाराष्ट्रातील 14 नामांकित कंपन्यांच्या नावाखाली झाला गाेरखधंदा

या प्रमुख मागण्यांसाठी निघालाय बिऱ्हाड मोर्चा

- दिनांक 25 मे 2023 रोजी चे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे

- दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये..

- दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे ते त्यांना सेवेतून कमी करू नये.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com