sangli , sangli news  saam tv
महाराष्ट्र

Sangli Accident : नाशकातील अपघाताची घटना ताजी असतानाच सांगली हादरलं; युवक मृत्यूमुखी

विजय पाटील

Sangli News : नाशिक शहरात झालेल्या अपघाताच्या बातमीनं आज संपुर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला. ही घटना ताजी असतानाच राज्यातील सांगली जिल्ह्यात घडलेल्या एका भयवाह अपघाताची माहिती समाेर आली आहे. या अपघातामधील (accident) गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तसेच वाहन (car) चालकाच्या शरीराचा बराचसा भाग जळून गेला हाेता. ही घटना सांगली (sangli) जिल्ह्यात घडली आहे. खानापूर तालुक्यातील बलवडी मधील मकबूल गौसलाजम पटेल (वय २५) या युवकाचा अपघातात होरपळून मृत्यू झाला आहे. (Breaking Marathi News)

सांगलीच्या पलूस शहरातील जुना सातारा रस्त्यावरील आंधळी फाट्यानजीक हा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आधी अपघात झाला आणि नंतर गाडीनें पेट घेतला आणि त्यात गाडीसह चालक जळून खाक झाला अशी माहिती समोर आली आहे. अपघातावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणालाही कल्पना नव्हती. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. (Sangli Accident News)

मकबूल नेहमी कामा निमित्ताने बाहेर असायचा. त्याचा फळांचा व्यापार आणि केळी निर्यातीचा व्यावसाय आहे. अपघाताच्या दिवशीही त्याने घरी यायला रात्री उशीर होईल असे फोन करून घरी सांगितले होते. पलूसकडून बलवडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंधळी फाट्याच्या जवळ त्याच्या गाडीला अपघात झाला.

ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे या अपघाताची कोणालाही कल्पना नव्हती. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या अपघातात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. (Sangli Latest Marathi News)

मकबूल यांच्या शरीराचा बहुतांश भाग जळाला होता. पलूस पोलिसांनी घटनास्थळचा पंचनामा केला. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT