Sangli : एलसीबीची धडाकेबाज कारवाई; २४ तासांत युवकाची सुटका, सहा युवक अटकेत

प्रणव पाटील याचे पैसे वसूल करण्यासाठी अपहरण करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.
Sangli , Sangli Crime News, LCB
Sangli , Sangli Crime News, LCBsaam tv
Published On

Sangli Crime News : शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत देत नसल्याने एकाचे अपहरण केल्याचा प्रकार सांगली पोलिसांनी उघडकीस आला आहे. कुपवाड येथील प्रणव पाटील या तरुणाची (youth) सुटका करत अपहरण करणा-या गुंतवणूकदारासह सहा जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (Local Crime Branch) अटक (arrest) करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

कुपवाड येथील राहणारे प्रणव पाटील या तरुणाचे त्याच्या घरापासून अज्ञात सहा जणांनी गाडीतून फिल्मी स्टाईलने गुरुवारी अपहरण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रणव पाटील यांची पत्नी वैष्णवी यांनी अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. (Maharashtra News)

Sangli , Sangli Crime News, LCB
Udayanraje Bhosale : पैशाशिवाय त्यांना दुसरं काही सूचत नाही; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

पाेलीसांनी अवघ्या 24 तासांत या अपहरणाचा छडा लावला. पाेलीसांनी प्रणव पाटील यांची सुटका केली. या प्रकरणात पाेलीसांनी सहा जणांना अटक केली आहे. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

Sangli , Sangli Crime News, LCB
Nashik Breaking News : नाशकात पाच लाखांच्या बनावट नाेटा जप्त; इडली विकणाऱ्याची चाैकशी सुरु

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार राजू काळे (वय 23) , सागर कोळेकर (वय 33), किरण लोखंडे (वय 23 ), सोन्या उर्फ बापू येडगे (वय 27) , संदेश घागरे (वय 19) आणि कल्पेश हजारे (वय 21 अशी अटक केलेल्यांचे नावे आहेत. सागर कोळेकर यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने पाटील यांचं अपहरण केल्याचे कबुली दिली आहे.

Sangli , Sangli Crime News, LCB
Nashik Bus Accident: अपघाताचा थरारक Video आला समोर; संपूर्ण बस खाक, उरले फक्त सांगाडे

दुप्पट अमिष आणि अधिक परताव्याच्या आमिषाने सागर कोळेकर याने गावातल्या काही लोकांकडून सुमारे एक कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये प्रणव पाटील यांच्याकडे गुंतवले होते. मात्र कोणत्याही प्रकारचा परतावा व पैसे प्रणव पाटील हा परत करत नव्हता.

Sangli , Sangli Crime News, LCB
Sangli News : निर्दयीपणाचा कळस ! धावत्या रिक्षातून फेकलं वृद्ध महिलेला

त्यामुळे सागर कोळेकर याने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रणव पाटील याचे पैसे वसूल करण्यासाठी अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Sangli , Sangli Crime News, LCB
Kass Pathar : पर्यटकांनी बहरलं 'कास'; पठारावरील फुलं हिरमुसली (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com