Crime News, Latur News saam tv
महाराष्ट्र

Crime News : वडिलांच्या खुनाचा काढला वचपा, कारने त्यांना चिरडले; नऊ जणांवर गुन्हा दाखल

या वाहनाच्या धडकेत करण सोळुंके हे जागीच ठार झाले तर मुलगा दिपक जखमी झाला.

दीपक क्षीरसागर

वडिलांच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीस जामीन मिळाल्याचा राग मनात धरून गाडी अंगावर घालून एकास ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर लातूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे.

निलंगा (nilanga) तालुक्यातील येळणूर येथील आकाश सोळुंके याने दाखल केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात यातील जखमी व ज्यांना ठार मारण्यात आले त्यांस जामीन मंजूर झाल्याचा राग मनात धरून संशयिताने निलंगा येथील तारखेला जात असताना यातील आकाश सोळंके याने करण भीमराव सोळुंके (वय ५१) व त्यांचा मुलगा दीपक करण सोळुंके (वय २८) यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या वाहनाच्या धडकेत करण सोळुंके हे जागीच ठार झाले तर मुलगा दिपक जखमी झाला. त्यानंतर गाडीतील सर्वांनी लोखंडी रॉड, सळई व लाकडी काठ्या,दगडाने मारून दिपकला गंभीर जखमी केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर लातूर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार चालू आहेत.

याबाबत विक्रम करण सोळंके (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश अनिल सोळुंके (गाडी चालक) व राहुल अनिल सोळंके ,शोभा अनिल सोळुंके, अमर सुनील सोळुंके, सुनील तात्याराव सोळुंके, अजित बालाजी सोळुंके, परमेश्वर बालाजी सोळंके, बालाजी रघुनाथ सोळंके, अनंत भागवत मोहिते (सर्व राहणार येळणूर) यांनी कट रचून निलंगा ते शिंदखेड रोडवर किसन रामजी शिंगाडे यांच्या शेताजवळ रोडवर वडील करण यांना जीवे ठार मारून खून केला असल्याचा गुन्हा (crime) दाखल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT