Navi Mumbai News : 'जेएनपीटी' त सीमा शुल्क विभागाची सलग दुसरी माेठी कारवाई

त्यानंतर पुन्हा एकदा माेठी कारवाई झाली आहे.
Navi Mumbai, JNPT
Navi Mumbai, JNPTsaam tv

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : नवी मुंबई (navi mumbai) येथील जेएनपीटी बंदरात पुन्हा एका सीमा शुल्क विभागाने माेठी कारवाई केली आहे. या कारवाईत विविध दर्जेदार कंपन्यांचे सुमारे तीन कोटी रुपयांचे बारा मेट्रिक टन साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सीमा शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात मोठी कारवाई केली हाेती. त्यावेळी मोबाईल एक्सेसरीज माेठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा माेठी कारवाई झाली आहे.

Navi Mumbai, JNPT
Kass Pathar : प्रतापगडानंतर कास पठारावर जिल्हाधिका-यांची धडाकेबाज कारवाई; दहा वर्षानंतर स्थानिकांत आनंद

सीमा शुल्क विभागाने झाडू, ब्रश आणण्याच्या नावाखाली ई- सिगारेट्स, ई- सिगारेट्सच्या रीफिल, खेळण्यांसह ब्रँडेड सौंदर्यसाधनांची तस्करी केल्याचे उघड झाले आहे. सूत्रांच्या माहितीनूसार तीन कोटी रुपयांचे बारा मेट्रिक टन साहित्य सील (seal) करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Navi Mumbai, JNPT
Sharad Pawar News : शरद पवार जाणता राजा ही छत्रपती शिवरायांशी तुलना अयाेग्य : नरेंद्र पाटील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com