youth marries transgender woman in amravati Saam Digital
महाराष्ट्र

Transgender Wedding : चर्चा आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याची; युवकाने तृतीयपंथीयाशी बांधली गाठ

Amravati Transgender Marriage : या विवाह सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. समाजात तृतीयपंथीयांच्या बाजूने बदल होताना दिसत असल्याचे समाधान सुलताना यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati :

प्रेमात जात पात धर्म पाहिले जात नाही असे आपण नेहमीच ऐकताे, म्हणतो मात्र आता सोबतच प्रेमात लिंगभेद सुद्धा पाहिला जात नाही हे देखील समाेर आले आहे. लिंगभेदापुढे जाऊन एका युवकाने तृतीयपंथीयाशी विवाह केला. विशेष म्हणजे या विवाहाला कुटुंबातील मंडळींनी सहमती दिली. त्यानंतर धूमधडाक्यात दाेघांचा विवाह अमरावती येथे पार पडला. (Maharashtra News)

अमरावती येथील उत्तम नगर परिसरातील निकु या तृतीयपंथीयाशी बडनेरा मार्गावरील गोंड बाबा मंदिरात चेतन नासरे या युवकाशी भेट झाली. वारंवार भेटीमुळे दोघांमध्ये प्रेम जडले. तब्बल अडीच वर्षापर्यंत सोबत मैत्रीत, प्रेमात राहिल्यानंतर चेतन व निकु यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

चेतन याने निकु बाबतची माहिती कुटुंबियांना देत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. मुलाच्या इच्छे खातर चेतनच्या आई-वडिलांनी या लग्नाला परवानगी दिली. सर्व कुटुंबीयांच्या साक्षीने अमरावतीमध्ये हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या विवाह सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. समाजात तृतीयपंथीयांच्या बाजूने बदल होताना दिसत असल्याचे समाधान सुलताना यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT