नांदेड : सराफाला लुटणा-या तिघांना अटक, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

Nanded Marathi News : बोधडी येथील दत्ता शहाणे हे आपले दुकान बंद करून घराकडे जात होते. घराकडे जात असताना त्यांच्या डोळ्यात मिर्चीची पूड टाकून दागिने लुटले हाेते.
nanded police arrests three who looted jewellers
nanded police arrests three who looted jewellersSaam Digital

- संजय सूर्यवंशी

Nanded Crime News :

नांदेड जिल्ह्यात सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्यांना एलसीबीने अटक केली. संशयितांकडून 6 लाख 23 हजार 15 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उदय खंडेराय (पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

उदय खंडेराय (पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड) म्हणाले बोधडी येथील दत्ता शहाणे हे आपले दुकान बंद करून घराकडे जात होते. घराकडे जात असताना त्यांच्या डोळ्यात मिर्चीची पूड टाकली. मिर्चीची पूड टाकून त्यांच्या जवळील 7 लाख 58 हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम 65 हजार रुपये चोरट्याने लंपास केले होते.

nanded police arrests three who looted jewellers
RTE Admission : पालकांनाे! ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जाणून घ्या संकेतस्थळ

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी गावात घटना घडल्याने एकच खळबळ उडाली हाेती. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शाेध सुरु आहे. संशयित आरोपींकडून 6 लाख 23 हजार 15 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

nanded police arrests three who looted jewellers
Nanded Police News : शाब्बास नांदेड पोलिस! चाेरीस गेलेले 164 मोबाईल हस्तगत, 70 नागरिकांना केले परत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com