Latur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime News: अनैतिक संबंधांच बिंग फुटू नये म्हणून मर्यादा ओलांडल्या, तरुणाला शेतात नेऊन...

Latur Police: प्रकरणी पोलिसांनी (Latur Police) दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Priya More

संदीप भोसले, लातूर

Latur News: अनैतिक संबंध (Extra Marital Affair) पाहिल्यामुळे एका 28 वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील खरबवाडी येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Latur Police) दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील खरबवाडी येथे दोन दिवसांपूर्वी गणेश वस्तुरगे या 28 वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. शेतामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता. गणेश ज्या गावामध्ये राहत होता त्याच गावातील प्रदीप करडखेले याचे गावातील महिलेसोबत अनैतिक संबध होते. गणेशने प्रदीपला या महिलेसोबत पाहिले होते.

त्यामुळे गणेश गावामध्ये सगळीकडे सांगेल या भीतीने प्रदीपने गणेशची हत्या केली. संदीपने गणेशचा गळा आवळून त्याची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात 302, 201, 34 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास वाढवणा पोलीस करत आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील प्रेम प्रकरणातून 28 वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. चौघांनी या तरुणाची विळ्याने गळा चिरुन हत्या केली. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथे ही घटना घडली. समाधान यादवराव बोराडे असे या तरुणाचे नाव असून गावातीलच चार जणांनी मिळून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: चतुर्थीच्या योगात आज चार राशींच्या नशिबाचा तारा चमकणार! पाहा तुमची रास आहे का?

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर

DK Rao Arrest : दाऊदचा कट्टर दुश्मन, गँगस्टर डीके रावच्या मुसक्या आवळल्या, कारण काय ?

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

SCROLL FOR NEXT