Parabhani News
Parabhani News राजेश काटकर
महाराष्ट्र

धक्कादायक : वाळू उपसा करण्यास विरोध केल्याने वाळू माफियांकडून तरुणाची हत्या

राजेश काटकर

परभणी : गंगाखेड (Gangakhed) तालुक्यासह पालम तालुक्यातील काही वाळू घाटांचे लिलाव झाले असून या वाळू घाटासह इतर ठिकाणाहून देखील वाळूमाफिया गौण खनिज उत्खननाच्या नियमाची पायमल्ली करत दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करत आहेत. पालम तालुक्यातील रावराजुर येथील रहिवासी माधव त्रिंबक शिंदे यांनी रात्रीच्या वेळी वाळू (sand) उपसा करू नये असे सांगितल्याचा मनात राग धरून वाळूमाफियांनी मारहाण केल्यामुळे माधव शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. गंगाखेड पोलीस स्टेशन येथे आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची घटना २९ मार्च रोजी घडली आहे.

पालम (Palam) तालुक्यातील रावराजुर येथील रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य यांचा मुलगा माधव त्रिंबकराव शिंदे हे रात्रीच्या वेळी गोदावरी नदी (Godavari River) पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यास विरोध करत होता त्यामुळे प्रकाश डोंगरे व धक्यातील भागीदारांची माधव शिंदे यांच्यावर खुन्नस होती. २४ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता सुरेश शिंदे व इतर दोघे गोदावरी नदी पात्रात जाणार्‍या रस्त्याने दुचाकीवरून गेले. ठेकेदार प्रकाश डोंगरे, भागीदार संदिप शिंदे, भागवत शिंदे, नितीन खंदारे, राजेभाऊ बोबडे, सर्जेराव शिंदे तेथे उभे होते.

यावेळी माधव शिंदेंनी रात्रीच्या वेळी वाळू नियमानुसार काढता येत नाही. असे सांगीतले असता राजूभाऊ बोबडे यांनी रेती बंद होणार नाही. तुला काय करायचे ते कर असे म्हणत हातातील रॉडने माधव शिंदे यांच्या कमरेखाली मारहाण केली. त्यानंतर प्रकाश डोंगरे यांनी धक्क्यात येवढे पैसे घातले आहेत ते काढायचे कसे असे म्हणत शिवीगाळ करत हातातील लोखंडी रॉडने मारहाण केली.

तसेच भागवत प्रकाश शिंदे, संदिप शिंदे, सर्जेराव शिंदे, ओमप्रकाश शिंदे, सुरेश शिंदे यांनी लाथा बुक्याने मारहाण केली. नांदेड येथे उपचारादरम्यान (ता.२५) मार्च रोजी माधव शिंदे यांचा मृत्यू झाला. तीन दिवस सदरील प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे येऊन श्रावण रामेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून प्रकाश डोंगरे, सुरेश शिंदे, ओमप्रकाश शिंदे, संदीप शिंदे, भागवत शिंदे, नितीन खंदारे, राजेभाऊ बोबडे, सर्जेराव शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळूला चांगला भाव मिळत असल्याने अवैध वाहतूक खूप वाढली आहे. अशातच शासकीय टेंडर कुणी घेत नसल्याने अवैध वाहुतक अधिक वाढली असून या वाळू माफियांना राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याने या लोकांची हिम्मत अधिक वाढली आहे. हप्ते देऊन अवैध वाहतूक करू द्या अन्यथा अशाप्रकारे हल्ले करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न वाळूमाफियांकडून सतत सुरू असतो यावर आळा घालायची पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT