Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: २५ पेक्षा जास्त वार करुन तरुणाला संपवलं, घटनेनं नाशिक हादरलं

Youth Killed By 5 People In Nashik: भरदिवसा ही घटना घडली असून या घटनेने नाशिक हादरले आहे. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे.

Priya More

Nashik News: नाशिकमध्ये (Nashik) 'मुळशी पटर्न' चित्रपटासारखी (Mulshi Patern Movie) घटना घडली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी भाजी विक्रेत्याची धारधार शस्त्रांनी वार करुन हत्या केली. भरदिवसा ही घटना घडली असून या घटनेने नाशिक हादरले आहे. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या घटनेचा तपास नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या लेखानगर येथील शॉपिंग सेंटर येथे ही घटना घडली आहे. भाजी विक्रेता संदीप आठवले (२२ वर्षे) याची हत्या करण्यात आली. चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी संदीपवर धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या केली. संदीपच्या पोटात, छातीत, मानेवर तब्बल २५ पेक्षा अधिक वेळा वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीपचा जागीच मृत्यू झाला.

संदीपवर हल्ला करुन हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. भर दिवसा हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संदीपच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञात टोळक्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भाजी विक्रेता संदीपच्या हत्येची ही घटना घटनास्थळावर एका दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारेच आरोपींचा शोध घेत आहेत. सध्या हे सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हल्ला करणारे संशयित हे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग तिसऱ्या गुरुवारी हे हत्येचं सत्र घडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT