Breaking News, yavatmal  saam tv
महाराष्ट्र

Breaking News : पेट्राेल टाकून मित्राला पेटवलं, युवक रुग्णालयात दाखल; संशयित पाेलिसांच्या ताब्यात

या घटनेचा तपास यवतमाळ पाेलिस दल करीत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Yavatmal Breaking News : मित्राने मित्राला जिवंत जाळण्याचा प्रयत्न आज यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शंकरपूर येथे घडला. या घटनेनंतर पाेलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. या घटनेत जखमी झालेल्या युवकावर (youth) यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

घटनास्थळ तसेच पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आकाश भोयर याने त्याचा मित्र संदीप वंजारी याच्याकडून दहा हजार रुपये हात उसने घेतले हाेते. ते त्याने परत करावेत यासाठी संदीपने तगादा लावला हाेता. परंतु आकाश पैसे देत नव्हता असे संदीपचे म्हणणे आहे. (Maharashtra News)

संदीप वंजारी याने आकाशला शेत शिवारात नेले. त्याला दारू पाजली. त्यानंतर संदीपने आकाशच्या अंगावर गाडीतील पेट्रोल (petrol) काढून ओतले तसेच त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आकाश भोयर या घटनेत पन्नास टक्के भाजला असून त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संदीप वंजारी याला पोलिसांनी (police) ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT