Cotton : कापूस खरेदी बंद, ताेडगा न निघाल्यास वाद चिघळण्याची शक्यता

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
Akola
Akolasaam tv
Published On

Akola News : पश्चिम विदर्भातील कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या अकोल्यातील अकोट (akot) बाजार समितीत कापूस हर्रासीवेळी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सौदापट्टीवर हलका माल वापस अशी नोंद करण्यास नकार दिला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधील कापूस हर्रासी सहा डिसेंबर रोजी बंद केली होती. (Maharashtra News)

त्यामुळे आठ दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने शेतकरी, बाजार समिती व व्यापाऱ्यांना झळ पोहोचत आहे. दरम्यान, कापूस खरेदीकडे जिल्हा उपनिबंधक यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कापूस खरेदी बंद असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता अधिक आहे.

Akola
Shri Sammed Shikharji : सरकारच्या 'या' निर्णयावर जैन समाज उतरला रस्त्यावर

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने कापूस खरेदी प्रकरणात कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर आठ डिसेंबरला वीस कापूस व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले होते. मात्र त्यानंतर आतापर्यंत बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना (farmers) खाजगी व्यापाऱ्याकडे कमी भावात कापूस विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Akola
Crime News : खून करुन अपघाताचा रचला बनाव, विम्याचे चार कोटी रुपये लाटले; महिलेसह पाच अटकेत
Akola
Cauliflower : फ्लाॅवरला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव; कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com