Cauliflower : फ्लाॅवरला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव; कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल

शेतमालाच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहे.
cauliflower, shirur, farmers
cauliflower, shirur, farmerssaam tv
Published On

Cauliflower : काढणीला आलेल्या फ्लॉवरला एक ते दोन रुपये किलोचा बाजारभाव मिळु लागल्याने उत्पादन खर्च तर सोडाच मात्र मजुरांचा खर्चही मिळत नसल्याने काळ्यात माती काबाड कष्ट करुनही शेतकऱ्यांच्या (farmers) कष्टाची मातीच होत असल्याचे वास्तव उघड्या डोळ्यांनी पहायला मिळत आहे. (Maharashtra News)

बाजारभावा अभावी शिरुर (shirur) तालुक्यातील चांडोह येथील विनायक लंघे या शेतकऱ्यांच्या दोन एकर फ्लॉवर पिकं शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पावसाच्या संकटातुन शेतकरी कसाबसा बाहेर पडुन नव्याने उभारी घेत तरकारी मालाकडे वळला. महागडी बियाणं, रोपं लागवड केली. त्यातच वातावरणातील बदलामुळे रोगराई पसरल्याने महागडी औषध फवारणी करण्याची वेळ आली.

cauliflower, shirur, farmers
Pune News : नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, मांत्रिकाचा महिलेवर अत्याचार

त्यामुळे शेतमालाचा उत्पादन खर्च वाढला. मात्र हेच फ्लॉवर विक्रीसाठी आलं आणि एक ते दोन रुपया किलोचा बाजारभाव मिळु लागल्याने उत्पादन खर्च तर सोडाच मात्र मजुरांचा खर्चही निघत नसल्याने शेतक-याने कांढणीला आलेले फ्लॉवरमध्ये शेळ्या मेंढ्यांना सोडले.

cauliflower, shirur, farmers
Vegetables Price Slashed : भाज्यांचे दर गडगडले; दहा रुपयांपेक्षा कमी मिळताेय भाव, राजू शेट्टी चिंतेत

दरम्यान शेतमालाच्या बाजार भावावर स्थिरता आणुन शेतमालाच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

cauliflower, shirur, farmers
BJP News: सरपंच निवडीत दगा दिल्यास, गावच्या विकासाला निधी देणार नाही; भाजप आमदाराचा ग्रामस्थांना सज्जड दम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com