youth gets life term for molesting minor child Saam Digital
महाराष्ट्र

Dharashiv: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी युवकास जन्मठेप

youth gets life term for molesting minor child : विशेष म्हणजे आराेपीचे लग्न झालेले असून त्याचा पिडीतेच्या वयाच्या मुली असतानाही त्याने दुष्कर्म केलेले आहे असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकणी धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने रामेश्वर शिवाजी माने यास दाेषी ठरविले. त्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

6 ऑक्टोबर 2019 रोजी गतिमंद अल्पवयीन मुलीवर रामेश्वर माने याने लैंगिक अत्याचार केला. मुलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर तिने पाेलिस ठाण्यात धाव घेतली. आईच्या तक्रारीनूसार धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकार पक्षातर्फ आराेपी विराेधात 10 साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष व युक्तीवाद ग्राह्य धरुन बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपीला दोषी ठरवले. याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ज्या कलमाअंतर्गत आराेपीला दाेषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्यातील तरतुदीनूसार आराेपीस त्याचे उर्वरीत नैसर्गिक आयुष्य हे कारागृहात काढावयाचे आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT