Breaking News:  Saam tv
महाराष्ट्र

Beed Breaking News : धुलीवंदनाच्या दिवशीच तरुणावर काळाचा घाला; शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Beed News in marathi : बीडमधून धुलीवंदनाच्या दिवशीच अतिशय दुर्देवी घटना समोर आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावात धक्कादायक घटना घडली आहे.

विनोद जिरे

Beed News In Marathi :

बीडमधून धुलीवंदनाच्या दिवशीच अतिशय दुर्देवी घटना समोर आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावात धक्कादायक घटना घडली आहे. या गावात वायरला हात लागल्याने शॉक लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, धुलीवंदनाच्या दिवशी बीडच्या आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावात दुर्देवी घटना घडली. घरातील अंघोळीच्या बाथरूमजवळ कट झालेल्या वायरला हात लागल्याने शॉक लागून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

महेश दादासाहेब तोरडमल असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, महेश यांच्या पश्चात पत्नी मोहिनी, मुलगी, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. या घटनेने सुलेमान देवळा आणि पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

जालन्यात मायलेकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

जालन्यात शेततळ्यात बुडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. समाधान मानिक वानखेडे आणि आणि सुमित्रा मानिक वानखेडे या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने वानखेडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

समाधान आणि त्याची आई हे दोघे सकाळच्या सुमारास शेतात गेले होते. दुपार होऊनही परतले नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, त्यांना कुठेही आढळले नाही. काही वेळानंतर नातेवाईकांना शेततळ्यात काही तरी तरंगताना दिसले. त्यावरून शोध घेतला. तेव्हा दोघांचे मृतदेह आढळले. यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

गेमचेंजर’ ठरणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का? खणखणीत इंग्रजीत ठाकरे गटाच्या खासदारानं केंद्रीय मंत्र्यांना विचारले प्रश्न

Horoscope: प्रेम,नोकरीबाबत येईल आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Roasted Papad Side Effects: तुम्हीही पापड भाजून खाताय? मग होऊ शकतात हे गंभीर आजार, सवय आजच बदला

SCROLL FOR NEXT