Nashik Crime News SaamTv
महाराष्ट्र

Nashik Crime News: अंधश्रद्धेचा बळी! डॉक्टरकडे नाही भोंदूबाबाकडे गेला, तरुण पुन्हा परतलाच नाही; नाशिकमधील धक्कादायक घटना

Nashik Crime News: भोंदू बाबाच्या अघोरी विद्येचा प्रकाराने एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Vishal Gangurde

अजय सोनवणे

Nashik Crime News: भोंदू बाबाच्या अघोरी विद्येचा प्रकाराने एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या बागलाण मधील आलीयाबाद येथे हा प्रकार घडला आहे. प्रविण गुलचंद सोनवणे असे या तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

पिंपळकोठे येथील प्रविण सोनवणे याची तब्बेत बरी नसल्याने तो उपचारासाठी आलियाबाद येथील या भोंदूबाबाकडे गावठी उपचार करण्यासाठी जात होता. तर भोंदू बाबा याचेही मृताच्या घरी जाणे होते.

आठवडाभरापूर्वी मृत प्रविण सोनवणे हा भोंदूबाबाकडे उपचारासाठी गेला होता. मात्र बाबाने अघोरी उपाय करुन प्रविण सोनवणे याचा जीव घेतला. त्याला त्याच घरात टाकून बाहेर निघून गेला.

मृताचे कुटूंबीय मुलगा घरी आला नाही म्हणून त्याचे कुटुंबीय भोंदू बाबाला फोन करुन विचारणा करीत होते. मात्र बाबा त्यांना उडवाउडवीचे उत्तर देत होता. आदिवासी वस्तीत भोंदूबाबा याचे एकांतात राहायचा, त्याकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. (Maharashtra Political News)

मात्र गावातील दोघांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिस पाटील यांना दिली. त्यानंतर त्यांनी जायखेडा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पाहणी केली.

त्यावेळी प्रविण याचा मृदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. दरम्यान तुळशीराम बुधा सोनवणे हा भोंदू बाबा मात्र आपल्या एका साथिदारासह फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या भोंदू बाबावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratangad Fort History: सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रतनगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Dasara Melava Live Update : भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पंकजा मुंडे भडकल्या

Face Care: दररोज फेस पावडर लावण्याची सवय आहे, मग चेहऱ्याला होऊ शकतात 'हे' स्किन प्रॉब्लेम्स

Prajakta Mali: जांभळ्या साडीत प्राजक्ताचं मराठमोळ सौंदर्य...

Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगावच्या मेहरूण तलावातील घटना

SCROLL FOR NEXT