Maharashtra Political News: सरकारच्या कर्त्याधर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला नको काय? ठाकरे गटाचा 'सामना'तून सवाल

Saamana Editorial On Maharashtra Bhushan Award Ceremony: दैनिक 'सामना'तून ठाकरे गटाने शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
Saamana Editorial On Maharashtra Bhushan Award Ceremony
Saamana Editorial On Maharashtra Bhushan Award CeremonySaam tv
Published On

Mumbai News: नवी मुंबईतील खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेत आतापर्यंत उष्मघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. १३ श्रीसदस्यसांच्या उष्मघाताने झालेल्या मृत्यूवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दैनिक 'सामना'तून जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सरकारच्या कर्त्याधर्त्यांवर, आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला नको काय? असा सवाल दैनिक 'सामना'तून ठाकरे गटाने शिंदे सरकारला केला. (Latest Marathi News)

अग्रलेखात काय म्हटलंय?

दैनिक 'सामना'तून ठाकरे गटाने शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाने टीका करताना म्हटले की, 'मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ खारघरला जमले होते, ते अमित शहा यांना मुजरे झाडण्यासाठी, पण जो लाखोंचा भव्य समुदाय जमला होता तो फक्त अप्पासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी. भर दुपारी तळपत्या उन्हात, 42 डिग्री अशा तापलेल्या वातावरणात भक्त जमले याचे कौतुक अमित शहा यांनी केले. इतकी भव्य गर्दी त्यांना आयतीच मिळाली. त्यामुळे समोरच्या भक्तांच्या डोक्यांवरील आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता वक्ते भाषणे ठोकीत राहिले व शेवटी ज्याची भीती होती तेच घडले'.

Saamana Editorial On Maharashtra Bhushan Award Ceremony
Maharashtra Politics : डबल इंजिन सरकारला तिसरं इंजिन लागलं तर... भाजप आमदाराचं सूचक वक्तव्य

'अप्पासाहेबांचा विचार हा श्रेष्ठ आहे व खेडय़ापाडय़ांतील त्यांच्या श्रीसेवकांनी तो स्वीकारला आहे. अप्पासाहेबांच्या विचारांची पारायणे करावीत व स्वतःचे पाप धुऊन काढावे असे काही लोक मंचावर होते. त्यांना अप्पासाहेबांच्या विचारांपेक्षा अप्पासाहेबांमुळे जमलेल्या अफाट गर्दीचा लोभ होता. या गर्दीत त्यांना मानवता कमी व मतेच जास्त दिसली. त्याचाच फटका शेवटी बसला व समोरील भाबड्या जिवांचा बळी गेला, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली.

'पाहुण्यांसाठी विशेष थंड मंडप घातला गेला व श्री सेवक मात्र उन्हात शरीर भाजत बसले. आता या आगीत जे मरण पावले, त्यांचा दोष काय? मग सरकारच्या कर्त्याधर्त्यांवर, आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला नको काय? मंचावर जे सरकार म्हणून उपस्थित होते ते सगळेच या दुर्घटनेचे अपराधी आहेत, असं टीकास्त्र ठाकरे गटाने केलं.

'देवेंद्र फडणवीस यांनी फक्त शोक संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी मृतांची किंमत लावून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली, पण खारघर येथे झालेला 13 श्री सेवकांचा मृत्यू सरकारी बेफिकिरी व राजकीय लोभामुळे झाला. त्याचे प्रायश्चित्त कोणी घ्यायचे? अप्पासाहेबांना दिलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’मुळे जो आनंद झाला, त्यास गालबोट लावण्याचे काम मुख्यमंत्री व त्यांच्या अति फाजील टोळीने केले, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली.

Saamana Editorial On Maharashtra Bhushan Award Ceremony
Dhananjay Munde Not Reachable : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आहेत तरी कुठे? नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

'पुलवामा स्फोटात दाखवलेल्या माणुसकीशून्य व्यवहारामुळे आपल्या 40 जवानांचे नाहक बळी गेले. जवानांची सुरक्षित ने-आण करण्यासाठी या सरकारने साधे विमान दिले नाही व त्यामुळे 40 जवान स्फोटात मारले गेले. मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे अप्पासाहेबांनी तळमळीने सांगितले, पण मानवतेच्या बाबतीत उदासीनता दाखविणारे मंचावर होते. सूर्य त्यामुळेच जास्त कोपला असावा, अशी टीका ठाकरे गटाने केली .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com