Beed Crime विनोद जिरे
महाराष्ट्र

धक्कादायक! सावकाराच्या जाचास कंटाळून 21 वर्षीय विद्यार्थी तरुणाची आत्महत्या

५ सावकारांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड: खाजगी सावकारांकडून घेतलेले पैसे व्याजासह देऊनही, कुटुंबियांना (Family) सावकाराकडून दिला जाणारा त्रास असाह्य झाल्याने, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थी (Student) तरुणाने, गळफास घेऊन स्वतः जीवन संपवलं आहे. "मी हे सहन करू शकत नाही, मला माफ करा". असा व्हॉट्सअॅप (WhatsApp) मेसेज कुटुंबियांना करत त्याने आत्महत्या केली आहे. तर याप्रकरणी २ आठवड्यानंतर, बीड (Beed) शहर पोलीस (Police) ठाण्यामध्ये, ५ सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा-

पंकज बबन काळे (वय- २१) रा. जिजामाता चौक बीड, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत पंकजचे वडील बबन काळे हे माजलगाव पंचायत समितीत विस्ताराधिकारी आहेत. त्यांनी २०१९ मध्ये १० रुपये शेकडा दराने, किशोर बाजीराव पिंगळे या सावकाराकडून ७ लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील ६० आर जमीन आणि बीड शहरातील पत्नीच्या नावे असणारे राहते घर सावकार पिंगळे याने लिहून नोटरी करून घेतले होते.

त्यानंतर व्याजासह मूळ रक्कम पिंगळे यास देऊनही, सावकार पिंगळे याने बबन काळे यांच्या पत्नीवर धनादेश न वटल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर १ मे रोजी विस्ताराधिकारी असणारे, बबन काळे हे माजलगावला ध्वजारोहणासाठी गेले होते. त्या दिवशी कुटुंबातील व्यक्ती देखील बाहेर होते. मात्र, मयत पंकज हा एकटाच घरी होता. सावकाराकडून घरी येऊन सततची धमकी, मारहाण याला वैतागून शेवटी पंकजने कुटुंबीयांना व्हाट्सअपद्वारे मेसेज करून, घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी मयत पंकज याचे वडील बबन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, किशोर पिंगळे, रंणजीत पिंगळे, राजकुमार गुरखुदे, हनुमंत उर्फ बंडू पिंगळे आणि आशिष सोनी यांच्याविरोधात, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एक सावकाराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, ४ सावकार अद्यापही फरार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad smell in car: कोणत्या कारणांमुळे कारमध्ये दुर्गंधी येऊ लागते?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवं वळण! सलमान खानसह ४ बड्या अभिनेत्यांच्या घरांची रेकी, मुंबईतील 'या' व्यक्तीने केली मदत

Political News : राजकारणात खळबळ! मुख्यमंत्र्यांना ३ तास दिल्ली एअरपोर्टवर थांबवलं; ५० हजारांचा दंड घेतल्याचा आरोप

Marigold Plant : दिवाळीपर्यंत झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं; माळ्याची ही मोफत ट्रिक वापरा

Weak Heart Symptoms: ही १० लक्षणे सांगतील तुमचे हृदय कमजोर झाले आहे: चुकूनही करू नका दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT