पाणी साचलेल्या खड्यात पडून तरुणीचा मृत्यू अजय दुधाणे
महाराष्ट्र

पाणी साचलेल्या खड्यात पडून तरुणीचा मृत्यू

औरंगाबाद शहरातील राजनगरात पाण्याच्या प्रवाहात २० फुटांपर्यंत वाहून गेली

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - शहरात मंगळवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे Rain खोल खड्याचा अंदाज न आल्याने मुकुंदवाडीतील Mukundvadi राजनगरमध्ये रात्री आठच्या सुमारास २१ वर्षीय रूपाली दादाराव गायकवाडचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमुळे Lockdown घरची परिस्थिती बिकट झाल्याने ती एका कंपनीत नोकरी करत होती. तेथून घरी येत असतानाअसताना कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यातून ती रस्ता शोधत होती.

मंगळवारी सायंकाळी सात वाजता रूपाली ही तिची मैत्रीण आम्रपाली रघुनाथ म्हस्केसोबत घरी जाण्यासाठी निघाली. पावसामुळे त्यांना मुकुंदवाडी रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. रूपालीला पाण्यामुळे अंदाज न आल्याने ती खोल खड्डयात पडली. वेगात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात ती पडल्याने वीस फुटांपर्यंत वाहून गेली. स्थानिकांना हा प्रकार दिसताच त्यांनी धाव घेत तिला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

हे देखील पहा -

मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर स्थानिक नागरिक, नातेवाइकांचा संताप झाला. त्यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. बहुजन समाज पार्टी प्रदेश सचिव सचिन बनसोडे, जिल्हा सचिव अमोल पवार, जिल्हा सचिव राहुल निकम, सिराज शेख, विष्णू वाघमारे, प्रल्हाद तारू यांनी मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, अनिता साळवे यांनीही मनपाकडे आर्थिक मदतीची तसेच पथदिवे, रस्ता दुरुस्तीचीही मागणी केली. जमाव चिडल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मनपा अधिकाऱ्यांनी रूपालीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच राजनगर, मुकुंदनगर ते मूर्तिजापूरपर्यंत सिमेंट रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले.

रूपालीला आई- वडील, भाऊ, एक मोठी विवाहित बहीण आहे. वडील मिस्त्रीकाम करतात. शिक्षणाची आवड असलेल्या रूपालीने नुकतीच नामांकित महाविद्यालयातून बीसीएची पदवी मिळवली होती. तिला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे होते. लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती बिघडल्याने कुटुंबाला मदत म्हणून तिने चिकलठाण्यातील बांधकाम कंपनीत नोकरी सुरू केली होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp New Feature: फालतू मेसेजेसची चिंता संपणार, WhatsApp लवकरच आणत आहे नवीन फिचर, वाचा सविस्तर

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

SCROLL FOR NEXT