थरारक! तरुणीने बिबट्याचं डोकं फोडून केली स्वत:ची सुटका Saam Tv
महाराष्ट्र

थरारक! तरुणीने बिबट्याचं डोकं फोडून केली स्वत:ची सुटका

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे एक थरारक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महागाव : यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील महागाव येथे एक थरारक घटना घडली आहे. एका तरुणीवर बिबट्याने हल्ला केला असता, त्या तरुणीने बिबट्यावरच प्रतिहल्ला केला आहे. बिबट्याच्या आणि तिच्या सुरु असलेल्या झटापटीत तिने बिबट्याच्या डोक्यावर चक्क कळशीने एका पाठोपाठ एक अनेक वार केले. या वारांमुळे बिथरलेल्या बिबट्याने तरुणीची मान जबड्यातून दिली जंगलात बिबट्याने पोबारा केला आहे. तरुणीने हे धाडस दाखवले आणि तिचा जीव वाचला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून तिला पुसद येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

हे देखील पहा-

संबंधित तरुणीचे नाव वृषाली आहे. वृषाली आपल्या आईसोबत पाणी आणायला गेली असता ही घटना घडली आहे. बिबट्याने अचानक त्यांच्यावर मागून हल्ला केला. बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे काही कळायच्या आतच बिबट्याने वृषालीची मान बिबट्याने जबड्यात घेतली. झालेल्या झटापटीतही वृषालीने प्रसंगावधान दाखवले, हातात असलेल्या पाण्याच्या कळशीने बिबट्याच्या डोक्यावर एका पाठोपाठ एक वार केले आणि तीन-चार वार बिबट्याच्या कपाळावर बसल्यानंतर बिबट्याने माघार घेतली आणि वृषालीची मान जबड्यातून सोडली.

वृषालीच्या अंगावर काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत तसेच पायाला मोठी दुखापत झाली आहे. आसपासच्या लोकांनी त्वरित तिला पुसद येथे रुग्णालयात Hospital उपचारासाठी दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे, अंबरनाथच्या उपनगराध्यक्षांकडून भ्रष्टाचाराचं समर्थन

दोन महिन्यात मिसिंग लिंकवर खड्डे, नागरिकांचा संताप, पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डे

PM Modi Death Threat: पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; जगभरात खळबळ, तपास यंत्रणा सतर्क

जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलींच्या शरीराचे लचके तोडले; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा; शरद पवार गटानं टाकला मोठा डाव, पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

SCROLL FOR NEXT