Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

नागपुरातील तरुण पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या!

लग्न मोडल्यानं पोलिसाला नैराश्य?

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - नैराश्याने ग्रासलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटने समोर आली आहे. पोलीस (Police) वसाहतीमधील घरात गळफास घेऊन पोलिसाने आत्महत्या केली. किरण सलामे असे आत्महत्या केलेल्या 30 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सतत येणाऱ्या संकटामुळं नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे. जून मध्ये होणारे लग्न तुटल्याने ते नैराश्यात होते अशी माहिती समोर आली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरु नका, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. किरण सलामे यांनी आत्महत्या केल्याने नागपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. किरण हे मूळचा कोंढाळी येथील रहिवासी. 2014 मध्ये ते शहर पोलीस दलात रुजू झाले. गेल्या एक वर्षापासून ते धरमपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते धरमपेठ परिसरातील पोलीस वसाहतीत आई आणि छोट्या भावासह राहत होते.

शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास किरण आपल्या खोलीमध्ये झोपायला गेले. रविवारी सकाळी आईने त्यांना आवाज दिला. मात्र दार आतून बंद होते. वारंवार आवाज देऊनही किरण प्रतिसाद देत नसल्याने आईने शेजाऱ्यांना सांगितले. शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरच्या भागातून डोकावले असता किरण गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. हे पाहून पोलीस कर्मचाऱ्यांसह सगळ्यांच मोठा धक्का बसला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

SCROLL FOR NEXT