Sangli OnePlus ब्लास्ट प्रकरण: खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli OnePlus ब्लास्ट प्रकरण: खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी

आटपाडी तालुक्यातील एका तरुणाकडील oneplus कंपनीच्या मोबाईलचा खिशात स्फोट झाला आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली: आटपाडी तालुक्यातील एका तरुणाकडील oneplus कंपनीच्या मोबाईलचा खिशात स्फोट झाला आहे. यामुळें त्या तरुणाच्या मांडीला गंभीर इजा देखील झाली आहे. मोबाईल (Mobile) ब्लास्ट (Blast) झाल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी आटपाडी (Atpadi) तालुक्यातील प्रकाशवाडी मधील हा तरुण या प्रकारानंतर मोबाईल कंपनीच्या (company) विरोधात आटपाडी पोलिस (Police) स्टेशनमध्ये तक्रार देखील केली आहे. सदर तरूणाने काही  महिन्यांपूर्वीच मोबाईल सांगलीतील (Sangli) एका शॉपी मधून घेतला होता.

हे देखील पहा-

आपल्या खिशातच स्मार्टफोनचा स्फोट झाल्याचं सांगत त्यांनी कंपनीविरुद्ध संताप व्यक्त केला होता. फोटोमध्ये फोन जळल्याचं दिसतंय. फोन खालच्या बाजूने पूर्णपणे फुटला आहे. फोनचा ब्लास्ट झाला त्यावेळी OnePlus मोबाइल पीडित तरुणाच्या खिशात होता. अशात अचानक स्फोट झाल्याने त्या व्यक्तीच्या मांडीला अतिशय गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याभागातील संपूर्ण त्वचा निघाली आहे. (young man was injured when mobile phone exploded pocket)

यापूर्वी १ ऑगस्ट दिवशी वनप्लस मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. पाच दिवसांपूर्वी विकत घेतलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची माहिती अंकूर शर्मा यांनी दिली होती. तर 8 सप्टेंबर या दिवशीदेखील दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत मोबाईलचा ब्लास्ट झाल्याचं म्हटलं होतं.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

Chhatrapati Sambhajinagar: रेडीको एनव्ही कंपनीमधील बॉयलरचा स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, सीसीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू

IND vs AUS: लय अवघड हाय गड्या.. दोनदा बॅटिंगला येऊनही विराटला अवघ्या इतक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT