अमरावतीच्या लुम्बिनी नगरात भरदिवसा युवकाची हत्या  SaamTv
महाराष्ट्र

अमरावतीच्या लुम्बिनी नगरात भरदिवसा युवकाची हत्या

लुम्बिनी नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या ऋत्विक बेलेकर या युवकाच्या घरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी घुसून ऋत्विकवर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती - अमरावती शहराच्या संजय गांधी नगर परिसरालगतच्या लुम्बिनी नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या ऋत्विक बेलेकर या युवकाच्या घरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी घुसून ऋत्विकवर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा झालेल्या या हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. Young man killed in in Lumbininagar Of Amravati

हे देखील पहा -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास ऋत्विक आपल्या घरी असताना तीन हल्लेखोर गाडीवर बसून आले व सरळ ऋत्विकच्या घरात प्रवेश करीत ऋत्विकवर चाकूने वार केले व तेथून पळून गेले. परिसरातील नागरिकांच्या हा हल्ला झाल्याचं लक्षात येताच नागरिकांनी ऋत्विकला ताबडतोब जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी त्याला जागीच मृत घोषित केले. घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली व तपासाची सूत्रे हलवली. ऋत्विकची हत्त्या कोणत्या कारणाने झाली हे अद्याप उघड झाले नसले तरी या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT